आजारी असताना, विशेषकरून ताप आला असेल किंव्हा पोट बिघडलं असेल. जेवण करायचा कंटाळा आला असेल किंव्हा खूप थकवा आला असेल अश्या वेळी पटकन होणारा पौष्टिक पदार्थ म्हणजे हि खिचडी. लहान मुलांना सुद्धा भरवण्यासाठी एकदम उत्तम.
साहित्य:
साहित्य:
तांदुळ- १/२ कप
मूग डाळ- १/४ कप
जीरे- १ टीस्पून
काळी मिरी- २ ते ४ (ऐच्छिक )
हिंग- १/४ टीस्पून
हळद- १/२ टीस्पून
मीठ चवीनुसार
पाणी- ३ ते ४ कप (मी इथे ३ कप वापरले आहे, ज्याप्रमाणात खिचडी पातळ व मऊ हवी आहे तसे वापरावे )
साजूक तूप - १ टीस्पून + वरून घेण्यासाठी आवश्यकतेनुसार
कृती:
डाळ-तांदूळ स्वच्छ धुउन, आवश्यक पाण्यात भिजत ठेवावेत. पाणी मोजून घेतल्यास तेच पाणी खिचडी बनवताना वापरता येते.
कुकरमध्ये तूप गरम करून मिरी व जीरे जरासे परतावे. मग हिंग, डाळ-तांदुळ, पाणी, हळद व मीठ टाकावे आणि कूकर बंद करून गॅसवर ठेवावा.

३-४ शिट्टया झाल्यानंतर गॅस बंद करावा आणि कूकरला ८-१० मिनीट बंद ठेवावा. कुकर उघडल्यावर रवीने थोडेसे खिचडीला घाटावे. आजारी माणसाना व लहान मुलांना खायला सोपे जाते. गुजराती पद्धतीत खिचडीला अस थोडं घाटल जाते. आवडत नसेल तर नाही घाटले तरी चालेल.
खिचडी फार पातळ व मऊ नको असेल तर फक्त १ १/२ कप पाणी वापरावे.
खिचडी फार पातळ व मऊ नको असेल तर फक्त १ १/२ कप पाणी वापरावे.
ही गरमागरम खिचडी भरपूर तूप घालून लोणचे किंवा लिंबाच्या फोडीसोबत सोबत खावी. जोडीला कढी आणि पापड असेल तर सोने पे सुहागा ! काय ?
No comments:
Post a Comment
आपल्या प्रतिसादाने नवीन गोष्टी करण्यास उत्साह मिळतो. आपला अभिप्राय, सुचना आम्हाला ज़रूर कळवा. आपल्या प्रेमाचा वर्षाव असाच कायम राहो.