Thursday, March 28, 2013

Rice Vegetable Ring (राइस व्हेजीटेबल रिंग)

जरा हटके अशी ही बिर्यानी आहे ...नक्की करून बघा.
Read this recipe in English.........click here.

साहित्य:
राइस बनवण्यासाठी:
 • उकडलेले चणे- १/४ कप
 • शिजवलेला भात- २ कप
 • लिंबाचा रस- २ टीस्पून
 • बारीक चिरलेला लसूण- १/२ टीस्पून
 • मिक्स हर्ब्स- १ टीस्पून
 • मीर पूड- १ टीस्पून
 • ऑलिव तेल- २ टीस्पून
 • मीठ चवीनुसार
व्हेजीटेबल रिंग बनवण्यासाठी:
 • कांद्याच्या रिंगा- ४
 • १/२ इंचाच्या चौकोन आकारात कापलेला कांदा - १/४ कप
 • टोमाटो स्लाइस- ४
 • १/२ इंचाच्या चौकोन आकारात कापलेली शिमला मिरची - १/४ कप
 • २ इंचाच्या चौकोन आकारात कापलेली शिमला मिरची - ४ चौकोन
 • बेबी कॉर्न- ४ (१ इंचाच्या तुकड्यात कापावी)
 • गाजर- १ (१/४ इंचाच्या तुकड्यात कापावे)
ग्रेव्ही बनवण्यासाठी :
 • बारीक कापलेला कांदा- १/२ कप
 • बारीक कापलेला टोमाटो- १/२ कप
 • लसूण पाकळ्या- ८
 • दालचिनी- १/२ इंचाचा तुकडा
 • लाल मिरची पूड - १ टीस्पून
 • साखर- १/४ टीस्पून
 • मिरी पूड- १/२ टीस्पून
 • ऑलिव तेल- २ टेबलस्पून
 • किसलेले प्रोसेस्ड चीज- १/२ कप
 • ऑलिव स्लाइस - ५ 
 • मीठ चवीप्रमाणे 

कृती:
 • एका पॅन मध्ये तेल गरम करून त्यात दालचिनी, कापलेला कांदा व लसूण टाकून गुलाबी रंगावर परतून घ्यावा. त्यात टोमाटो आणि मीठ टाकावे. टोमाटो मऊ होईपर्यंत शिजवावे. त्यात मिरची पूड, मीर पूड, मिक्स हर्ब्स आणि साखर टाकून अजून थोडे परतून घ्यावे. हे मिश्रण थंड झाल्यावर मिक्सर मधून वाटून घ्यावे. ग्रेव्ही तयार....
 • एका बाउल मध्ये वर दिल्याप्रमाणे राइस बनवण्यासाठी जे साहित्य दिले आहे ते सर्व एकत्र करावे. 
 • बेबी कॉर्न ब्लांच करावे. वरील सर्व भाज्या (व्हेजीटेबल रिंग बनवण्यासाठी नमूद केल्या आहेत त्या ) थोड्याश्या तेलात परतून घ्याव्यात. परतताना चवीप्रमाणे थोडे मीठ आणि मिरपूड भूभूरावी. 
 • एका ओवन प्रूफ चौकोनी डिश मध्ये वरील राइस पसरून घ्यावा. मध्यभागी एक खड्डा बनवावा. त्याच्या कडेला फोटोत दाखवल्याप्रमाणे सिमला मिरचीचा मोठा चौकोनी तुकडा, टोमाटो स्लाइस आणि बेबी कॉर्न चे तुकडे एकाआड एक लावावेत. 
 • त्या खड्ड्यात परतलेल्या उर्वरित भाज्या टाकून त्यावर ग्रेव्ही ओतावी व वर किसलेले चीज पसरावे. चार बाजूला चार कांद्याच्या रिंगा व ऑलिव चे स्लाइस ठेवावे. 
 • ५ ते ८ मिनिटे ओवन मध्ये बेक करावे. खायला तयार ....


Saturday, March 23, 2013

Thai Noodles (थाई नूडल्स)

या नूडल्स चवीला चायनीज नूडल्स पेक्षा वेगळ्या लागतात. थोड्याशा आंबट-गोड, थोड्याशा तिखट ......Read this recipe in English.......click here.

साहित्य:
 • हाक्का नूडल्स- १ पाकीट (२०० ग्रॅम )
 • उभी चिरलेली सिमला मिरची- १/४ कप
 • उभी चिरलेले बेबी कॉर्न- १/२ कप
 • उभी चिरलेले गाजर- १/४ कप
 • उभी चिरलेला कांदा- १/२ कप
 • बारीक चिरलेले आले- १ टेबलस्पून
 • बारीक चिरलेला लसुण- १ टेबलस्पून
 • शेंगदाणा तेल- ५ टेबलस्पून
 • दाण्याचा  कुट- १/४ कप
 • चिंचेचा घट्ट कोळ- १ टीस्पून (१/४ टीस्पून गूळ त्यात मिसळा.)
 • थाई बार्बेक्यू सॉस- १ टेबलस्पून (ऎच्छिक)
 • रेड चिली सॉस किव्हा सांबल - २ टीस्पून
 • सोया सॉस- १ टेबलस्पून
 • चिरलेली कोथिंबीर- १/४ कप
 • मीठ चवीप्रमाणे
कृती:
 • पाकिटावर दिलेल्या सूचनेप्रमाणे नूडल्स शिजून घ्या.
 • वोक किव्हा मोठ्या पसरत भांड्यात तेल गरम करा. त्यात लसुण, आल आणि कांदा टाकून मिनिट भर परतवा.
 • नंतर त्यात सर्व चिरलेल्या भाज्या टाकून २-३ मिनिटे परतवा. त्यात सर्व सॉस व मीठ टाकून परतवा.
 • त्यात उकडलेल्या नूडल्स टाकून, व्यवथित एकत्र करा. अजून २-३ मिनिटे परता.
 • कोथिम्बिर आणि दाण्याचा कुट घालून गरमागरम वाढा.  
Wednesday, March 20, 2013

कॉर्न चाट

मक्याच्या दाण्यांना बनवा मजेदार .......


Read this recipe in English......

साहित्य:

उकडलेले मक्याचे दाणे - १ १/२ कप
उकडून कापलेला बटाटा- १/४ कप
कापलेला टोमाटो- १/२ कप
कापलेला कांदा- १/४ कप ( छोट्या रिंगा तयार करा )
बारीक चिरलेली हिरवी मिरची - १/४ टीस्पून
बारीक चिरलेली कोथिम्बिर- १/४ कप
बारीक चिरलेला पुदिना- १ टेबलस्पून ( या ऐवजी पुदिना चटणी वापरली तरी चालेल)
डाळिंबाचे दाणे- १/४ कप
कापलेली कैरी - १ टेबलस्पून (ऎच्छिक)
लिंबाचा रस- १ टेबलस्पून
चिंचेची चटणी- १ टेबलस्पून
लाल मिरची पूड- १/२ टीस्पून
सैंधव- १/२ टीस्पून
चाट मसाला- १ टीस्पून


वरील सर्व साहित्य एकत्र करावे. शक्यतो सर्व पदार्थ ताजे असावेत.
हवी असल्यास वरून पिवळी शेव भुरभुरावी.
Monday, March 4, 2013

सांबल ( मलेशिअन चटणी किंव्हा चिली-गार्लिक सॉस)
Read this recipe in English.......

साहित्य:
आलं- १ इंचाचा तुकडा  
ओल्या लाल मिरच्या- १०
लसुण पाकळ्या - १०
कांदा - १ मोठा 
तेल- ४ टेबलस्पून 
लिंबाचा रस - ४ टेबलस्पून 
साखर - २ टीस्पून 
मीठ - २ टीस्पून किंव्हा चवीप्रमाणे  

कृती:
 आलं व कांदा सोलून त्याचे तुकडे करा.लसुन सोला. मिक्सर मध्ये त्याची पाणी न घालता पेस्ट बनवा.  जरुरी वाटल्यास थोडे तेल घाला.
तेल पँन  मध्ये गरम करून त्यात तयार पेस्ट टाकून परतून घ्या. तेल सुटेपर्यंत परता. नंतर त्यात लिंबाचा रस, साखर आणि मीठ घाला. मिश्रण व्यवस्थित एकत्र करून अजून २ मिनिटे परतावा. एका बाउल मध्ये काढून घ्या.

सांबल फ्रीजमध्ये २-३ आठवडे आणि फ्रिझरमध्ये २-३ महिने टिकू शकते.

सांबल तळलेले टोफू, पनीर, बटाटे व इतर भाज्या  इत्यादी सोबत तसेच फ्राईड राईस, उकडलेले अंडे, ग्रील्ल्ड किंव्हा उकडलेले मांस, मासे इत्यादी सोबत चटणी किंव्हा सॉस प्रमाणे खाउ शकता.

Saturday, March 2, 2013

Bharalelya Mirachya (भरलेल्या मिरच्या )

चटकदार आणि चमचमीत ………साहित्य:

 • भावनगरी किंव्हा मोठ्या मिरच्या- ८ ते १० (नेहमीच्या मिरच्या पण चालतील, त्यातल्या त्यात मोठ्या आणि जाड शोधून घ्याव्यात. पण त्या फार तिखट लागतील. )   
 • खवलेले ओले खोबरे- १ कप  (अंदाजे अर्धा नारळ)
 • मोहरी- १ टेबलस्पून 
 • तीळ - १ टेबलस्पून 
 • मेथीदाणे- ४ ते ६ दाणे 
 • लिंबाचा रस- २ टेबलस्पून 
 • हळद- १ टीस्पून 
 • हिंग- १/४ टीस्पून 
 • साखर- १/२ टीस्पून 
 • मीठ चवीनुसार 
 • तेल- आवश्यकतेनुसार 

कृती:

 • मिरच्या धुऊन पुसून घ्याव्यात. मिरच्याना मधोमध उभी चीर द्यावी. आतून-बाहेरून थोडे मीठ चोळून १०-१५ मिनिटे ठेऊन द्याव्यात. (त्यामुळे मिरच्या मऊ होतात आणि भरताना तुटत नाहीत. शिवाय लवकर शिजतात आणि बाहेरून पचक्या लागत नाहीत.) 
 • मंद अग्नीवर मोहरी, तीळ आणि मेथीदाणे छान खमंग भाजून घ्या. खलबत्याने कुटून घ्या किंव्हा मिक्सरमध्ये भरड वाटा. एका बाउल मध्ये ओलं खोबर, कुटलेला मसाला, हळदलिंबाचा रस, साखर आणि मीठ  हे सर्व एकत्र करून हाताने चुरून कालवा. 
 • वरील सारण सर्व मिरच्यात भरा.
 • एका पसरट नॉन-स्टीक पँन मध्ये थोडेसे तेल गरम करून मंद अग्नीवर मिरच्या दोन्ही बाजूने सोनेरी रंगावर खमंग परताव्यात.