Read this recipe in English...........
साहित्य:
- रोल ओटस- १ कप
- पाणी - ३/४ कप
- कांदा, बारीक चिरलेला - २ टेबलस्पून
- आलं, बारीक चिरलेलं - १ टेबलस्पून
- गाजर, बारीक चिरलेलं - २ टेबलस्पून
- शिमला मिरची, बारीक चिरलेली - १ टेबलस्पून
- मटार - २ टेबलस्पून
- हिरवी मिरची,बारीक चिरलेली - ४
- कोथिम्बिर, बारीक चिरलेली - २ टेबलस्पून
- खवलेल ओल खोबर - २ टेबलस्पून (ऐच्छिक )
- मोहरी- १ टीस्पून
- हळद- १/२ टीस्पून
- हिंग- १/४ टीस्पून
- ऑलिव ओईल किंव्हा कुठलही तेल- ३ टीस्पून
- मीठ- चवीप्रमाणे
कृती :
- एका प्यान मध्ये तेल गरम करा. मोहरी टाका, तडतडल्यावर त्यात मिरची, कांदा आणि आल टाका. हळद आणि हिंग टाकून जरासं परता. त्यात राहिलेल्या भाज्या आणि मीठ टाकून १-२ मिनिट परता. पाणी टाका आणि उकळी येऊ द्या.
- त्यात ओटस टाका आणि व्यवस्थित ढवळून एकत्र करून घ्या. झाकण ठेऊन १ मिनिट वाफ काढा. मिश्रण खूप कोरडे वाटत असेल तर किंचित पाणी शिंपडा.
- पण एक लक्ष्यात ठेवा कि पाण्याचे प्रमाण हे ओटस पेक्षा कमीच असले पाहिजे अन्यथा मिश्रण चिकट बनेल.
- नंतर त्यात कोथिंबीर आणि खोबर टाकून व्यवस्थित ढवळून एकत्र करून घ्या. मिश्रण थंड होऊ द्या .
- त्या मिश्रणाचे सारखे गोळे करून इडली पात्रात किंव्हा मोदक पात्रात ४ ते ५ मिनिट वाफवा. मायक्रोवेव्ह ओवन मध्ये पण करू शकता.
- टोमाटो केचप किंव्हा कुठल्याही चटणीसोबत गरमागरम वाढा.
No comments:
Post a Comment
आपल्या प्रतिसादाने नवीन गोष्टी करण्यास उत्साह मिळतो. आपला अभिप्राय, सुचना आम्हाला ज़रूर कळवा. आपल्या प्रेमाचा वर्षाव असाच कायम राहो.