बाप्पाचे आणि आपल्या सर्वांचे आवडते - उकडीचे मोदक. गणपती बाप्पा मोरया !
साहित्य :
सारण (चव) :
साहित्य :
सारण (चव) :
- खवलेल ओलं खोबर -१ १/२ कप (साधारण २ मध्यम आकाराचे नारळ, फक्त पांढरा भाग घ्यावा )
- चिरलेला गूळ- १ १/४ कप
- वेलची पूड- १ टीस्पून
- भाजलेली खसखस- १ टीस्पून (ऐच्छिक - मी वापरत नाही)
- साजूक तूप- १ टीस्पून
- मोदकाचे तांदूळ पीठ- १ १/२ कप (जाडे तांदूळ स्वच्छ धुवून सावलीत वाळवावे व दळून आणावे किंव्हा बाजारात तयार सुध्द्धा मिळते.)
- पाणी- १ १/२ कप
- मीठ- चिमुटभर
- तेल- १ टीस्पून
कृती :
गणपतीबाप्पाचा नैवेद्य तयार ………पण मोदकावर ताव कोण मारणार ? बाप्पा बिचारा वासाचा धनी. - जाड बुडाच्या पातेल्यात किंव्हा नॉन-स्टिक पॅनमध्ये खवलेल ओलं खोबर, गूळ, तूप एकत्र करून मध्यम ते मंद आचेवर १५ मिनिटे शिजववे. सतत हलवत रहावे , करपणार नाही याची काळजी घ्यावी. रंग बदलला आणि घट्ट होऊ लागले कि वेलची पूड टाकून, व्यवस्थित ढवळून गॅस बंद करावा. जास्त शिजवू नये, चिक्कीसारखे घट्ट होईल. याप्रमाणे सारण आधीच तयार करून ठेवावे.
- पाणी उकळत ठेवावे.पातेल्यातील पाण्याला उकळी आल्यावर त्यात तेल व मीठ घालावे. नंतर पाणी ढवळून त्यात पीठ घालावे व उलथन्याच्या टोकाने एकाच बाजूने ढवळावे. झाकण ठेवून वाफ आणावी. तयार झालेली उकड गरम असतानाच मळून घ्यावी. जास्त गरम असताना वाटीच्या साह्याने गुठळ्या मोडून घ्याव्यात. त्यातली थोडी उकड ताटात काढून हाताला थोडे तेल व पाणी लावून मळावी. छान, मऊ, एकजीव उकड तयार करावी. उकड ओल्या कपड्याने कपड्याने झाकून ठेवावी.
- नंतर त्याचा मोठ्या लिंबाएवढा गोळा घेऊन वाटीसारख्या आकाराची पारी करावी. त्यात सारण भरावे व मोदकाचा आकार द्यावा. तयार मोदक सुध्दा ओल्या कपड्याने कपड्याने झाकून ठेवावेत. नाहीतर सुकून तडे जातात.
- असे ७-८ मोदक झाले की मोदकपात्रातील चाळणीवर कपड्याचा तुकडा किंवा केळीच्या पानाचा तुकडा घालून त्यावर ठेवून १५-२० मिनिटे वाफवावे. किंव्हा कुकरला शिट्टी न लावता सुध्द्धा वाफवता येतात.
No comments:
Post a Comment
आपल्या प्रतिसादाने नवीन गोष्टी करण्यास उत्साह मिळतो. आपला अभिप्राय, सुचना आम्हाला ज़रूर कळवा. आपल्या प्रेमाचा वर्षाव असाच कायम राहो.