Monday, April 29, 2013

मोडाच्या मुगाचा भात

मोड आलेल्या मुगाची उसळ किंव्हा आमटीच आपण करतो. पण हा भात सुद्धा छान लागतो.
Read this recipe in English....... click here.


साहित्य:
 • शिजवलेला (किंव्हा शिळा) भात - १ कप
 • उकडलेले मोडाचे मुग- १/२ कप
 • चिरलेला कांदा- १/२ कप
 • चिरलेली सिमला मिरची - १/४ कप
 • जिरे- १/२ टीस्पून
 • हळद- १/२ टीस्पून
 • हिंग- १/४ टीस्पून
 • लाल मिरची पूड- १ टीस्पून
 • गरम मसाला- १/२ टीस्पून
 • तेल- २ टेबलस्पून
 • मीठ चवीप्रमाणे
 • कोथिंबीर आणि टोमाटो चकत्या सजावटीसाठी


कृती:
 • भाताची शीते हलक्या हाताने मोकळी करून घ्यावी. 
 • एका कढई मध्ये तेल गरम करून जिरे, शिमला मिरची, कांदा गुलाबी रंगावर परतून घ्यावा. नंतर त्यात हळद, हिंग, मिरची पूड, मुग टाकून १-२ मिनिट परतून घ्यावा. त्यात भात आणि मीठ टाकून छान एकत्र करून झाकण लाऊन एक वाफ द्यावी. 
 • कोथिम्बिर आणि टोमाटोने सजून गरमागरम वाढा.

Saturday, April 27, 2013

कैरीची चटणीRead this recipe in English... 

साहित्य :

 • खवलेल ओल खोबर- १/४ कप
 • कैरीचे तुकडे, सालासकट- १/४ कप
 • हिरव्या मिरच्या - २ ते ३
 • साखर- १ टीस्पून 
 • मीठ- चवीनुसार
 • पाणी- जरुरीनुसार 


कृती:
वरील सर्व जिन्नस एकत्र वाटून चटणी तयार करावी.
मिरची आणि साखरेच प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी-जास्त करता येईल.

थोड्या वेगळ्या चवीसाठी ३ पाकळ्या लसूण किंव्हा अर्धा इंच आल वाटणात घालू शकता. पण एकावेळी एकतर आल तरी वापरा नाहीतर लसूण तरी वापरा. दोन्ही एकदम वापरू नका. चांगले लागत नाही.

कैरी एवजी कच्ची करवंद वापरू शकता.  ती चटणी पण फार छान लागते. 

Thursday, April 25, 2013

चुरमा लाडू

गुजरात व राजस्थान मध्ये प्रसिध्द असलेले चुरमा लाडू खास तुमच्यासाठी……………


Read this recipe in English..... click here.

साहित्य :
 • रवाळ गहू पीठ (कणिक) - २ कप
 • साजूक तूप- २ टेबलस्पून + १/२ कप
 • साजूक तूप किंव्हा वनस्पती तूप - तळण्यासाठी
 • दुध- जरुरी नुसार
 • पिठी साखर - २ कप
 • वेलची पूड- २ टीस्पून
 • खसखस,भाजून- १/२ कप
 • मीठ - चिमुटभर

कृती:
 • परातीत कणिक आणि मीठ एकत्र करावे. २ टेबलस्पून तुपाचे मोहन घालावे. जसे लागेल तसे थोडे थोडे दुध घेऊन घट्ट कणिक भिजवावी.
 • वरील कणकेचे छोटे छोटे मुटके किंव्हा जाडसर पुऱ्या (पुऱ्या करणार असाल तर पुरीला टोचे मारा.) करून तुपात किंव्हा वनस्पती तुपात मंद आचेवर गुलाबी रंगावर तळून घ्यावेत. थंड करून घ्यावेत.
 • तळलेले मुटके हाताने फोडून खलबत्त्यात घालून कुटावेत किंव्हा मिक्सरवर जाडसर दळून घ्यावेत. 
 •  त्यात पिठी साखर, वेलची पूड आणि १/२ कप तूप कोमट करून घालावे. 
 • ते सर्व छान एकत्र करून लाडू वळावेत. वळून झाल्यावर खसखस मध्ये घोळून घ्यावेत. लाडू तयार.

कठीण वाटणारे लाडू प्रत्यक्षात किती सोपे आहेत, नाही का ?

Monday, April 22, 2013

Valachi Khichadi (वालाची खिचडी / डाळींब्यांचा भात )

ही खिचडी आमच्या कोकणात फार लोकप्रीय आहे.  खरतरं ही फक्त नावानेच  खिचडी आहे, आहे हा बिरड्याचा (वालाचा) मसालेभात … एकदा नक्की बनवा, नक्कीच पुन्हा पुन्हा बनवत राहाल.Read this recipe in English.......

साहित्य:
 • उत्तम प्रतीचा जुना तांदूळ - २ कप (बासमती घेण्याची गरज नाही, आंबेमोहर किंव्हा कोलम तांदूळ वापरावा)
 • मोड आणून सोललेले वाल- १ १/२  ते २ कप
 • चिरलेला कांदा- २ कप
 • चिरलेला टोमाटो- १ कप
 • ठेचलेला लसूण- १ टेबलस्पून (या भातासाठी आले अजिबात वापरू नका. आल्याची चव बिरड्याची चव घालवतो)
 • राई/ मोहरी- १ टीस्पून
 • जीरे- १ टीस्पून
 • हिंग- १/४ टीस्पून
 • हळद- १/२ टीस्पून
 • घरगुती मसाला / मिरची पूड- ४ ते ५ टीस्पून
 • गोडा मसाला- २ टीस्पून
 • खिसलेला गूळ- १/४ टीस्पून किंव्हा चिमुटभर (एच्छिक)
 • तेल- ५ ते ६ टेबलस्पून
 • गरम पाणी- ४ ते ४  १/४ कप (खास कोकणी चवीसाठी नारळाच दुध २ कप + पाणी २  १/४ कप वापरा)
 • मीठ चवीनुसार
 • बारीक चिरलेली कोथिंबीर- १/४ कप
 • खवलेले ओले खोबरे- १/४  कप (नारळाचे दुध वापरणार असाल तर खोबरे वापरण्याची गरज नाही. ) 
 • साजूक तूप- जरुरीनुसार (एच्छिक)

कृती:
 • तांदूळ आणि वाल धुउन  बाजूला ठेवावेत.
 • एका जड बुडाच्या पातेल्यात तेल गरम करून मोहरी टाकावी. 
 • ती तडतडली कि जीरे, लसूण, कांदा टाकावा. कांदा गुलाबी रंगावर परतून घ्यावा.
 • नंतर त्यात हळद, हिंग, मसाला टाकून जर परतावा. 
 • त्यात वाल, टोमाटो आणि १/४ कप खोबरे आणि गोडा मसाला टाकून मिनिटभर परतून घ्यावा. 
 • नंतर त्यात तांदूळ आणि मीठ टाकून छान एकत्र करून जर वेळ परतून घ्यावे. 
 • नंतर त्यात गरम पाणी टाकून १५ ते २० मिनिटे झाकण लाऊन भात शिजवावा. 
 • नंतर त्यात गूळ टाकून हलक्या हाताने हलउन छान एकत्र करून २ वाफा काढाव्यात. खिचडी तयार.
 • ही खिचडी प्रेशर कुकरमध्ये पण शिजवता येते.
 • वाढताना वरून कोथिंबीर आणि खोबर आणि थोडस तूप टाकावे. 
 • गरमागरम खिचडी कैरीची कढी किंव्हा टोमाटो सार बरोबर वाढावी


Friday, April 12, 2013

Val-Phanasachi Bhaji (कच्च्या फणसाची वाल घालून भाजी)

साधारण मार्च-एप्रिल हा कच्च्या फणसाचा  हंगाम असतो. नंतर फणस पिकायला लागतात. कोकणात कच्च्या फणसाचा वापर भाजीसाठी करतात. ही कोकणातील खूपच लोकप्रिय भाजी आहे. खरतर संपूर्ण  पश्चिम किनारपट्टीत कच्च्या फणसचा वेगवेगळ्या प्रकारे वापर केला जातो.


Read this recipe in English...... click here.


पूर्वतयारी:
 • हाताला आणि सुरीला तेल लाऊन घ्या. कापताना खूप चीक बाहेर येतो, म्हणून हि काळजी.
 • फणसाचे वरचे जाड साल काढून टाका. साधारण ३ इंचाचे तुकडे करून, लगेच पाण्यात टाका. कारण तो लगेच काळा व्हायला लागतो. नंतर पाण्यात १ चमचा तेल आणि चिमुटभर मीठ टाकून नरम होईपर्यंत ते तुकडे उकडून घ्या. कुकर मध्ये सुद्धा  उकडले तरी चालतील. २ शिट्ट्या घ्याव्यात.
 • मधला कडक दांडा काढून टाका. हातानी सहज कुस्करता येतो. पूर्वी  पाट्यावर ठेचून घ्यायचे. फूड प्रोसेसर मध्ये पाणी न टाकता भरड वाटून घेऊ शकता. पण अगदी त्याच वाटण करू नका.


या भाजीसाठी फणसाचा २ कप चुरा वापरला आहे. उरलेला डब्यात घालून डीप फ्रीझरला ठेवा. त्याचे वडे कसे करायचे नंतर ते पाहू.

साहित्य:
 • उकडून बारीक केलेला फणस - २ कप
 • मोड आणून सोललेले वाल- १/२ कप
 • चिरलेला कांदा- १/२ कप
 • ठेचलेला लसूण- ५ ते ६ पाकळ्या
 • घरगुती मसाला किंवा मालवणी मसाला- ३ टीस्पून
 • गोडा मसाला- १ टीस्पून
 • राई- १ टीस्पून
 • जीरे- १/२ टीस्पून
 • हळद- १/२ टीस्पून
 • हिंग- १/२ टीस्पून
 • कोकम- २ ते ३
 • गूळ- १/२ टीस्पून
 • तेल- ४ टेबलस्पून
 • खवलेले ओले खोबरे- १/४ कप
 • बारीक चिरलेली कोथिम्बिर - १/४ कप
 • मीठ- चवीनुसार 

कृती:
 • एका कढईत तेल गरम करून राई टाका, ती तडतडल्यावर जीरे, लसूण, कांदा टाकून परता. 
 • कांदा गुलाबी झाल्यावर हळद, हिंग आणि मसाला टाकून परता. 
 • त्यात मोडाचे वाल टाकून परता. थोडे पाणी घाला, झाकण ठेऊन ५ मिनिटे शिजवा. 
 • नंतर त्यात चुरलेला फणस, मीठ, गोडा मसाला टाकून छान एकत्र करा. लागल्यास थोडेसे पाणी टाका. मंद आचेवर १० ते १५  मिनिटे शिजवा. मधून मधून हलवत रहा.
 • वाल आणि भाजी शिजल्यावर गूळ आणि कोकम टाका. छान एकत्र करून परतावा. झाकण ठेऊन एक वाफ काढा.
 • खोबर आणि कोथिम्बिर टाकून गरमागरम तांदुळाच्या भाकरी किव्हा चपाती सोबत वाढा.

टीपा: 
 • मालवणी मसाला उपलब्द्ध नसेल तर (२ टीस्पून मिरची पूड + १ टीस्पून गोडा किंव्हा गरम मसाला) वापरावा.
 • भाजीत वालाच्या एवजी बारीक लाल चवळी, काळे वाटाणे, अख्खे मसूर किंव्हा चण्याच्या डाळीचा वापर करता येईल. पण लक्ष्यात घ्या कि वरील प्रत्येक कडधान्याला शिजायला वेगवेगळा वेळ लागतो. लाल चवळी किंव्हा काळे वाटाणे वापरायचे असतील ते आधीच उकडून घ्यावे लागतात.
 • वाल वापरणार नसाल तर गूळ आणि कोकम वापरायची आवश्यता नाही.
 • पण ज्यांना जराश्या गोडसर भाज्या आवडतात त्यांनी गूळ वापरायला काही हरकत नाही.

Tuesday, April 9, 2013

Coleslaw Sandwich (कॉलस्लो सँडविच)

 कॉलस्लो हा डच शब्द आहे. कॉल म्हणजे कोबी आणि स्लो म्हणजे सलाड.Read this recipe in English......click here.

साहित्य:
कॉलस्लो बनवण्यासाठी :
 • उभा चिरलेला कोबी- १ कप
 • उभा चिरलेला जांभळा कोबी- १ कप
 • उभी चिरलेली सिमला मिरची- २ टेबलस्पून
 • उभा चिरलेला गाजर-  १/४ कप
 • उभा चिरलेला कांदा- १/४ कप
 • थावझंट इसलंड (Thousand Island) स्प्रेड  - १/४  कप (बाजारात उपलब्ध आहे)
 • मीर पूड- १/२ टीस्पून 
 • चिली सॉस- १ टीस्पून
 • मस्टर्ड सॉस - १ टीस्पून
 • मीठ- चवीप्रमाणे 
इतर साहित्य:
 • ब्राऊन ब्रेड स्लाइस- १०
 • बटर- जरुरीप्रमाणे
 • पनीर- १०० ग्रॅम
 • मीठ आणि काळी मिरी- चवीप्रमाणे
कृती:
 • वरील सर्व कॉलस्लो बनवण्यासाठी लागणारे साहित्य एकत्र करावे.  कॉलस्लो तयार आहे. 
 • पनीरचे २ इंचाचे तुकडे करून थोड्याश्या तेलावर मिरपूड आणि मीठ टाकून परतून घ्यावेत. 
 • ब्रेडला दोन्ही बाजूला बटर लाऊन तव्यावर ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यावा. अशाप्रकारे सर्व ब्रेड भाजून घ्यावेत. किंव्हा सँडविच टोस्टर वापरा.  
 • ब्रेडवर कॉलस्लो पसरून त्यावर पनीरचे तुकडे ठेवावेत व वर ब्रेडची दुसरी स्लाइस लावावी. 
 • पनीर एवजी टोफू किंव्हा चिकन वापरू शकता. Thursday, April 4, 2013

कच्च्या टोमाटोची चटणीRead this recipe in English

साहित्य:

कच्चे टोमाटो - २५० ग्रॅम
हिरव्या मिरच्या - ३ ते ४ किंव्हा आवडीनुसार
राई - १ टीस्पून
जीरे- १ टीस्पून
हळद- १/२ टीस्पून
हिंग- १/२ टीस्पून
साखर- २ टेबलस्पून (टोमाटोच्या आंबट पणावर अवलंबून आहे, कमी-जास्त आवडीप्रमाणे)
दाण्याचा कुट - १/४ कप
बारीक चिरलेली कोथिंबीर - २ टेबलस्पून किंवा आवडीनुसार
तेल- ४ ते ५ टेबलस्पून
मीठ- चवीप्रमाणे
कृती :

टोमाटो उकडून घ्या. उकडताना वापरलेले पाणी वापरू नका. साल काढून टोमाटोचा लगदा करून घ्या.मिरचीचे छोटे तुकडे करा. कढईत तेल गरम करून राई टाका. तडतडली की जीरे, मिरच्या, हळद हिंग टाकून थोडे परतून घ्या. त्यात टोमाटोचा लगदा टाकून परतून घ्या, साखर आणि मीठ टाकून २-३ मिनिटे वाफ द्या. दाण्याचा कुट व कोथिंबीर टाकून आचेवरून खाली उतरा. आंबट, गोड, तिखट चटणी तयार.
पराठ्या बरोबर किंव्हा ताटाच्या डाव्या बाजू साठी खमंग चटणी तयार....

Tuesday, April 2, 2013

लाल भोपळ्याची भाजी

ही माझ्या आईची रेसिपी आहे .....मला ही भाजी खूप आवडते. लाल भोपळा हा अतीशय पौष्टिक असून त्यात 'अ' जीवनसत्व मोठ्या प्रमाणात असतात.  
श्रावण महिन्यात लाल भोपळ्याला खुप चव असते. काही सणाच्या दिवशी किंव्हा श्रावण महिन्यात आपण कांदा-लसूण जेवणात वापरत नाही, त्या साठी ही अगदी योग्य भाजी आहे.


Read this recipe in English....click here.

साहित्य:
 • लाल भोपळा - २५० ग्रॅम
 • बटाटा- १ मध्यम आकाराचा
 • हिरव्या मिरच्या- ५
 • मेथी दाणे - १/४ टीस्पून
 • हळद- १/२ टीस्पून
 • हिंग- १/४ टीस्पून
 • खवलेले ओले खोबरे- १/४ कप
 • बारीक चिरलेली कोथिम्बिर- १/४ कप
 • तेल- ३ ते ४ टेबलस्पून
 • मीठ- चवीप्रमाणे

कृती:
 • भोपळ्याच्या बिया आणि साले काढावीत. बटाटा सोलून घ्यावा. भोपळा आणि बटाट्याचे १/२ इंचाचे चौकोनी तुकडे करून घ्यावेत आणि धुऊन घ्यावे.
 • पॅनमध्ये तेल गरम करून मेथी, मिरची, हळद आणि हिंग घालून फोडणी करावी. त्यात बटाट्याचे तुकडे घालून परतावेत. झाकण लाऊन १ मिनिट शिजवावे.
 • नंतर त्यात भोपळा आणि मीठ टाकून व्यवथित परतून ४-५ मिनटे झाकण लाऊन मंद आचेवर शिजवावे. मध्ये मध्ये हलवावे. पाणी अजिबात टाकू नये. भोपळ्याला पाणी सुटते.
 • भाजी शिजली कि खोबरे आणि कोथिम्बिर टाकून भाजी उतरावी.
 • मेथी दाण्याऎवजी किंव्हा सोबत १/२ टीस्पून राई टाकू शकता. आवडत असेल तर १/४ टीस्पून गूळ किंव्हा साखर भाजीत घालती तरी चालेल.