शिराळी किंव्हा दोडके पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर बाजारात येतात. याची साल फार जाड आणि खरखरीत असते. भाजी करताना ती काढून टाकतात. परंतु त्यात भरपूर तंतुता (फायबर ) व लोह असत. त्यामुळे त्याची चटणी/भाजी केली तर त्याचा नक्कीच शरीराला उपयोग होईल.
Read this recipe in English............
साहित्य:
कृती:
Read this recipe in English............
साहित्य:
- शिराळी - २५० ग्रॅम (आपल्याला फक्त त्यांच्या सालांचाच उपयोग करायचा आहे )
- कांदा, चिरून - १ कप / १ मोठा
- मिरची, कापून - ३ ते ४
- लसुण , ठेचून - ६ पाकळ्या
- मोहरी - १ टीस्पून
- हळद- १/२ टीस्पून
- हिंग- १/४ टीस्पून
- मीठ- चवीनुसार
- तेल- ३ टेबलस्पून
- खवलेला ओला नारळ- १/४ कप
कृती:
- शिराळी स्वच्छ धुवा आणि त्याची साल काढा. खल-बत्ताच्या साह्याने साले कुटा. कुटताना थोडे मीठ टाका म्हणजे पाणी सुटून लवकर कुटले जाईल.
- हि कुटलेली चटणी एका बाउल मध्ये काढा. त्यात पाणी टाका आणि नंतर ती चटणी किव्हा ठेचा हाताने घट्ट पिळून घ्या. म्हणजे जास्तीचे मीठ निघून जाईल.
- एका कढईत तेल गरम करून मोहरी टाका, मोहरी तडतडली की मिरच्यांचे तुकडे, लसुण, कांदा टाका. कांदा गुलाबी झाला की त्यात हळद, हिंग टाका. व्यवस्थित एकत्र करून घ्या.
- नंतर त्यात पिळलेला ठेचा व मीठ टाका. व्यवस्थित एकत्र करून घ्या.
- गरज वाटल्यास त्यात थोडे पाणी शिंपडा. झाकण ठेऊन मंद आचेवर १० ते १५ मिनिटे किंव्हा भाजी शिजेपर्यंत शिजू द्या. मध्ये मध्ये भाजी हलवत रहा.
- वरून ओलं खोबर पेरा. गरमागरम भाकरी किंव्हा चपाती किंव्हा आमटी-भातासोबत वाढा.
No comments:
Post a Comment
आपल्या प्रतिसादाने नवीन गोष्टी करण्यास उत्साह मिळतो. आपला अभिप्राय, सुचना आम्हाला ज़रूर कळवा. आपल्या प्रेमाचा वर्षाव असाच कायम राहो.