Friday, July 5, 2013

Mirachi Vada (मिरची वडा)

ज्या लोकांना चमचमीत आवडत त्यांच्यासाठी  "मिरची वडा" हा  लोकप्रिय राजस्थानी प्रकार एक उत्तम पर्याय आहे.


Read this recipe in English........

साहित्य:
लांब व जाड्या मिरच्या- १० ते १२
तेल- तळण्यासाठी

सारण-
उकडलेले बटाटे, सोलून व किसून- १ कप
जिरे पूड- १/२ टीस्पून
धणे पूड- १/२ टीस्पून
मिरची पूड- १/४ टीस्पून (ऐच्छिक)
आमचूर- १/४ टीस्पून
मीठ चवीनुसार 

आवरण-
बेसन- १/२ कप
हळद- १/२ टीस्पून
हिंग-१/४ टीस्पून
मिरची पूड- १/४ टीस्पून
खायचा सोडा- १ चिमुटभर
मीठ चवीनुसार
पाणी- अंदाजे १/४ कप

कृती:
मिरचीला देठापासून खाली उभी चीर द्या. सारणासाठी दिलेले सर्व साहित्य एकत्र करून मळून घ्या.

आवरण बनवण्यासाठी पाणी सोडून सर्व साहित्य एकत्र करा व त्यात पाणी हळूहळू टाकून छान ढवळून घ्या. गुठळ्या मोडून घ्या.

बटाट्याचे सारण मिरचीत भरा. मिरची बेसनच्या मिश्रणात सर्व बाजूनी बुडउन वडे तळून घ्यावे.
चिंचेच्या  चटणीसोबत गरमागरम वाढाव्यात.

या भजीसाठी भावनगरी मिरच्या वापरू नये, अस माझ मत आहे. कारण भावनगरीची साल जाड असते, त्यामुळे तळल्यावर ती कच्ची राहते. जास्त वेळ तळला तर वडा करपतो.
दुसऱ्या लांब-जाड मिरच्या बाजारात येतात, त्या मी इथे वापरल्या आहेत. त्या थोड्या तिखट असतात. त्यामुळे सारणात लाल तिखट घातले नाही तरी चालेल. 

No comments:

Post a Comment

आपल्या प्रतिसादाने नवीन गोष्टी करण्यास उत्साह मिळतो. आपला अभिप्राय, सुचना आम्हाला ज़रूर कळवा. आपल्या प्रेमाचा वर्षाव असाच कायम राहो.