Sunday, July 7, 2013

भाजणी (थालीपीठाची)

भाजणी हा मराठी खाद्यसंस्कृतीमधील एक वैशिष्ट्यपूर्ण आणि विशेष गुणसंपन्न मूळ पदार्थ आहे. भाजणी घरात असेल तर घाईच्या किंवा अडचणीच्या वेळी केव्हाही पटकन खाण्याची सोय करता येते.

भाजणीचा उपयोग करून अनेक वैशिष्ट्यपूर्ण, चविष्ट व खमंग पदार्थ करता येतात. आपण नंतर ते पाहणारच आहोत.

पौष्टीकपणा हा भाजणीचा सगळ्यात महत्त्वाचा गुणधर्म आहे. धान्ये व कडधान्ये भाजून घेतल्याने भाजणी पचनास हलकी असते.

जितकी जास्त प्रकारची धान्ये व कडधान्ये आपण वापरू त्या प्रमाणत एकेका धान्य-कडधान्यातील घटक पदार्थांच्या कमतरतेची भरपाई होते.



माझी भाजणी करण्याची पद्दत :
मी भाजणीची पौष्टिकता वाढवण्यासाठी काही जास्तीचे पदार्थ त्यात टाकले आहेत.
त्याचप्रमाणे मी पारंपारिक भाजणीची कृती सुद्धा दिली आहे.

साहित्य:
  • तांदूळ (जाडा, भाकरीचा)- १ किलो
  • चणा डाळ - १/४ किलो
  • मुग डाळ किंव्हा अख्खे मुग- १०० ग्रॅम
  • उडीद डाळ किंव्हा अख्खे उडीद - १०० ग्रॅम
  • सोयाबीन - १०० ग्रॅम
  • गहू- १०० ग्रॅम
  • ज्वारी- १०० ग्रॅम
  • बाजरी- १०० ग्रॅम
  • नाचणी- १०० ग्रॅम
  • कुळीथ (हुलगे)- ५० ग्रॅम
  • मका (धान्य स्वरूपातील)- ५० ग्रॅम
  • जिरे - ५० ग्रॅम
  • धणे- ५० ग्रॅम
  • मेथी दाणे- १/२ टीस्पून (ऐच्छिक)

कृती:
सर्व धान्य-कडधान्य व जिरे, धणे एक एक करून, न करपवता लक्ष्यपूर्वक खमंग भाजून घ्या.
सर्व एकत्र करा आणि थंड होऊ द्या. गिरणीतून सरसरीत दळून आणा. कोरड्या जागी हवाबंद डब्यात ठेवा.
२-३ महिने हि भाजणी चांगली राहते.

पारंपारिक पद्धत (कोकणी):
  • तांदूळ (जाडा, भाकरीचा)- १ किलो
  • चणा डाळ - १/२ किलो
  • उडीद डाळ किंव्हा अख्खे उडीद - १/४ किलो
  • गहू- १/४ किलो
  • ज्वारी- १/४ किलो
  • जिरे - ५० ग्रॅम
  • धणे-१०० ग्रॅम

पारंपारिक पद्धत (इतर):
  • बाजरी- १ किलो
  • तांदूळ (जाडा, भाकरीचा)- १/२ किलो
  • ज्वारी- १/२ किलो
  • गहू- १/२ किलो
  • चणा डाळ - १/२ किलो
  • उडीद डाळ किंव्हा अख्खे उडीद - १/४ किलो
  • धणे- १/४ किलो

भाजणी घरात नसेल तर आयत्यावेळी जी पीठे घरात उपलब्ध असतील ती पीठे खमंग भाजून घरून त्याची सुद्धा थालीपीठे बनवता येतात.

No comments:

Post a Comment

आपल्या प्रतिसादाने नवीन गोष्टी करण्यास उत्साह मिळतो. आपला अभिप्राय, सुचना आम्हाला ज़रूर कळवा. आपल्या प्रेमाचा वर्षाव असाच कायम राहो.