हि आंबट- गोड चटणी सगळ्या चाट पदार्थांसाठी आवश्यक आहे. ती पाणीपुरी, भेळपुरी इत्यादी पदार्थात रंगत आणते. शिवाय भजी , सामोसा या सारख्या तळलेल्या पदार्थांची लज्जत वाढवते.
Read this recipe in English.........click here.
साहित्य:
खजूर, बिया काढून- १० ते १२
चिंच, बिया आणि दोरे काढून - १/४ कप
गुळ - १ कप
मिरची पूड- १ टीस्पून
हिंग- १/४ टीस्पून
मीठ - चवीप्रमाणे
पाणी -४ कप
कृती:
एका स्टीलच्या, जाड बुडाच्या भांड्यात वरील सर्व साहित्य मंद आचेवर २० मिनिटे उकळावं . थंड झाल्यावर मिक्सरमध्ये गुळगुळीत वाटून घ्यावं. गरज असल्यास चाळणीने गळून फ्रीज मध्ये ठेवा. फ्रिझरमध्ये अशी चटणी ६ महिने टिकू शकते.
चटणी पातळ हवी असल्यास थोडी घट्ट चटणी बाउलमध्ये काढून त्यात जरुरीप्रमाणे थोडे पाणी आणि चवीप्रमाणे मीठ टाकून पातळ करावी. (पाणी घातलेली फार टिकणार नाही.)
ही चटणी उपवासाला पण चालेल, फक्त त्यात हिंग टाकू नका.

No comments:
Post a Comment
आपल्या प्रतिसादाने नवीन गोष्टी करण्यास उत्साह मिळतो. आपला अभिप्राय, सुचना आम्हाला ज़रूर कळवा. आपल्या प्रेमाचा वर्षाव असाच कायम राहो.