ही खिचडी आमच्या कोकणात फार लोकप्रीय आहे.  खरतरं ही फक्त नावानेच  खिचडी आहे, आहे हा बिरड्याचा (वालाचा) मसालेभात … एकदा नक्की बनवा, नक्कीच पुन्हा पुन्हा बनवत राहाल.
Read this recipe in English.......
साहित्य:
कृती:
Read this recipe in English.......
साहित्य:
- उत्तम प्रतीचा जुना तांदूळ - २ कप (बासमती घेण्याची गरज नाही, आंबेमोहर किंव्हा कोलम तांदूळ वापरावा)
 - मोड आणून सोललेले वाल- १ १/२ ते २ कप
 - चिरलेला कांदा- २ कप
 - चिरलेला टोमाटो- १ कप
 - ठेचलेला लसूण- १ टेबलस्पून (या भातासाठी आले अजिबात वापरू नका. आल्याची चव बिरड्याची चव घालवतो)
 - राई/ मोहरी- १ टीस्पून
 - जीरे- १ टीस्पून
 - हिंग- १/४ टीस्पून
 - हळद- १/२ टीस्पून
 - घरगुती मसाला / मिरची पूड- ४ ते ५ टीस्पून
 - गोडा मसाला- २ टीस्पून
 - खिसलेला गूळ- १/४ टीस्पून किंव्हा चिमुटभर (एच्छिक)
 - तेल- ५ ते ६ टेबलस्पून
 - गरम पाणी- ४ ते ४ १/४ कप (खास कोकणी चवीसाठी नारळाच दुध २ कप + पाणी २ १/४ कप वापरा)
 - मीठ चवीनुसार
 - बारीक चिरलेली कोथिंबीर- १/४ कप
 - खवलेले ओले खोबरे- १/४ कप (नारळाचे दुध वापरणार असाल तर खोबरे वापरण्याची गरज नाही. )
 - साजूक तूप- जरुरीनुसार (एच्छिक)
 
कृती:
- तांदूळ आणि वाल धुउन बाजूला ठेवावेत.
 - एका जड बुडाच्या पातेल्यात तेल गरम करून मोहरी टाकावी.
 - ती तडतडली कि जीरे, लसूण, कांदा टाकावा. कांदा गुलाबी रंगावर परतून घ्यावा.
 - नंतर त्यात हळद, हिंग, मसाला टाकून जर परतावा.
 - त्यात वाल, टोमाटो आणि १/४ कप खोबरे आणि गोडा मसाला टाकून मिनिटभर परतून घ्यावा.
 - नंतर त्यात तांदूळ आणि मीठ टाकून छान एकत्र करून जर वेळ परतून घ्यावे.
 - नंतर त्यात गरम पाणी टाकून १५ ते २० मिनिटे झाकण लाऊन भात शिजवावा.
 - नंतर त्यात गूळ टाकून हलक्या हाताने हलउन छान एकत्र करून २ वाफा काढाव्यात. खिचडी तयार.
 - ही खिचडी प्रेशर कुकरमध्ये पण शिजवता येते.
 - वाढताना वरून कोथिंबीर आणि खोबर आणि थोडस तूप टाकावे.
 - गरमागरम खिचडी कैरीची कढी किंव्हा टोमाटो सार बरोबर वाढावी
 

Do you mean either one should use hot water or coconut milk and not both. Otherwise it will be 8+1/2 cup, which 'll make khichadi a paste. Please explain.
ReplyDelete२ कप तांदूळ घेतले तर .......
Deleteतांदूळ नवा असेल तर ४ कप , तांदूळ जुना असेल तर थोड पाणी जास्त घ्या.
नारळाचे दुध वापरणार असाल तर ...२ कप पाणी + २ कप दुध = ४ कप
किंव्हा ३ कप पाणी + १ कप दुध = ४ कप
फोडणीत शहाजिरे घातले तर छान वास येतो खिचडीला
ReplyDelete