Read this recipe in English...
साहित्य :
- खवलेल ओल खोबर- १/४ कप
- कैरीचे तुकडे, सालासकट- १/४ कप
- हिरव्या मिरच्या - २ ते ३
- साखर- १ टीस्पून
- मीठ- चवीनुसार
- पाणी- जरुरीनुसार
कृती:
वरील सर्व जिन्नस एकत्र वाटून चटणी तयार करावी.
मिरची आणि साखरेच प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी-जास्त करता येईल.
थोड्या वेगळ्या चवीसाठी ३ पाकळ्या लसूण किंव्हा अर्धा इंच आल वाटणात घालू शकता. पण एकावेळी एकतर आल तरी वापरा नाहीतर लसूण तरी वापरा. दोन्ही एकदम वापरू नका. चांगले लागत नाही.
कैरी एवजी कच्ची करवंद वापरू शकता. ती चटणी पण फार छान लागते.
No comments:
Post a Comment
आपल्या प्रतिसादाने नवीन गोष्टी करण्यास उत्साह मिळतो. आपला अभिप्राय, सुचना आम्हाला ज़रूर कळवा. आपल्या प्रेमाचा वर्षाव असाच कायम राहो.