Tuesday, April 2, 2013

लाल भोपळ्याची भाजी

ही माझ्या आईची रेसिपी आहे .....मला ही भाजी खूप आवडते. लाल भोपळा हा अतीशय पौष्टिक असून त्यात 'अ' जीवनसत्व मोठ्या प्रमाणात असतात.  
श्रावण महिन्यात लाल भोपळ्याला खुप चव असते. काही सणाच्या दिवशी किंव्हा श्रावण महिन्यात आपण कांदा-लसूण जेवणात वापरत नाही, त्या साठी ही अगदी योग्य भाजी आहे.


Read this recipe in English....click here.

साहित्य:
  • लाल भोपळा - २५० ग्रॅम
  • बटाटा- १ मध्यम आकाराचा
  • हिरव्या मिरच्या- ५
  • मेथी दाणे - १/४ टीस्पून
  • हळद- १/२ टीस्पून
  • हिंग- १/४ टीस्पून
  • खवलेले ओले खोबरे- १/४ कप
  • बारीक चिरलेली कोथिम्बिर- १/४ कप
  • तेल- ३ ते ४ टेबलस्पून
  • मीठ- चवीप्रमाणे

कृती:
  • भोपळ्याच्या बिया आणि साले काढावीत. बटाटा सोलून घ्यावा. भोपळा आणि बटाट्याचे १/२ इंचाचे चौकोनी तुकडे करून घ्यावेत आणि धुऊन घ्यावे.
  • पॅनमध्ये तेल गरम करून मेथी, मिरची, हळद आणि हिंग घालून फोडणी करावी. त्यात बटाट्याचे तुकडे घालून परतावेत. झाकण लाऊन १ मिनिट शिजवावे.
  • नंतर त्यात भोपळा आणि मीठ टाकून व्यवथित परतून ४-५ मिनटे झाकण लाऊन मंद आचेवर शिजवावे. मध्ये मध्ये हलवावे. पाणी अजिबात टाकू नये. भोपळ्याला पाणी सुटते.
  • भाजी शिजली कि खोबरे आणि कोथिम्बिर टाकून भाजी उतरावी.
  • मेथी दाण्याऎवजी किंव्हा सोबत १/२ टीस्पून राई टाकू शकता. आवडत असेल तर १/४ टीस्पून गूळ किंव्हा साखर भाजीत घालती तरी चालेल.



No comments:

Post a Comment

आपल्या प्रतिसादाने नवीन गोष्टी करण्यास उत्साह मिळतो. आपला अभिप्राय, सुचना आम्हाला ज़रूर कळवा. आपल्या प्रेमाचा वर्षाव असाच कायम राहो.