कॉलस्लो हा डच शब्द आहे. कॉल म्हणजे कोबी आणि स्लो म्हणजे सलाड.
Read this recipe in English......click here.
साहित्य:
कॉलस्लो बनवण्यासाठी :
Read this recipe in English......click here.
साहित्य:
कॉलस्लो बनवण्यासाठी :
- उभा चिरलेला कोबी- १ कप
- उभा चिरलेला जांभळा कोबी- १ कप
- उभी चिरलेली सिमला मिरची- २ टेबलस्पून
- उभा चिरलेला गाजर- १/४ कप
- उभा चिरलेला कांदा- १/४ कप
- थावझंट इसलंड (Thousand Island) स्प्रेड - १/४ कप (बाजारात उपलब्ध आहे)
- मीर पूड- १/२ टीस्पून
- चिली सॉस- १ टीस्पून
- मस्टर्ड सॉस - १ टीस्पून
- मीठ- चवीप्रमाणे
- ब्राऊन ब्रेड स्लाइस- १०
- बटर- जरुरीप्रमाणे
- पनीर- १०० ग्रॅम
- मीठ आणि काळी मिरी- चवीप्रमाणे
कृती:
- वरील सर्व कॉलस्लो बनवण्यासाठी लागणारे साहित्य एकत्र करावे. कॉलस्लो तयार आहे.
- पनीरचे २ इंचाचे तुकडे करून थोड्याश्या तेलावर मिरपूड आणि मीठ टाकून परतून घ्यावेत.
- ब्रेडला दोन्ही बाजूला बटर लाऊन तव्यावर ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यावा. अशाप्रकारे सर्व ब्रेड भाजून घ्यावेत. किंव्हा सँडविच टोस्टर वापरा.
- ब्रेडवर कॉलस्लो पसरून त्यावर पनीरचे तुकडे ठेवावेत व वर ब्रेडची दुसरी स्लाइस लावावी.
- पनीर एवजी टोफू किंव्हा चिकन वापरू शकता.
No comments:
Post a Comment
आपल्या प्रतिसादाने नवीन गोष्टी करण्यास उत्साह मिळतो. आपला अभिप्राय, सुचना आम्हाला ज़रूर कळवा. आपल्या प्रेमाचा वर्षाव असाच कायम राहो.