साधारण मार्च-एप्रिल हा कच्च्या फणसाचा हंगाम असतो. नंतर फणस पिकायला लागतात. कोकणात कच्च्या फणसाचा वापर भाजीसाठी करतात. ही कोकणातील खूपच लोकप्रिय भाजी आहे. खरतर संपूर्ण पश्चिम किनारपट्टीत कच्च्या फणसचा वेगवेगळ्या प्रकारे वापर केला जातो.
Read this recipe in English...... click here.
पूर्वतयारी:
या भाजीसाठी फणसाचा २ कप चुरा वापरला आहे. उरलेला डब्यात घालून डीप फ्रीझरला ठेवा. त्याचे वडे कसे करायचे नंतर ते पाहू.
साहित्य:
टीपा:
Read this recipe in English...... click here.
पूर्वतयारी:
- हाताला आणि सुरीला तेल लाऊन घ्या. कापताना खूप चीक बाहेर येतो, म्हणून हि काळजी.
- फणसाचे वरचे जाड साल काढून टाका. साधारण ३ इंचाचे तुकडे करून, लगेच पाण्यात टाका. कारण तो लगेच काळा व्हायला लागतो. नंतर पाण्यात १ चमचा तेल आणि चिमुटभर मीठ टाकून नरम होईपर्यंत ते तुकडे उकडून घ्या. कुकर मध्ये सुद्धा उकडले तरी चालतील. २ शिट्ट्या घ्याव्यात.
- मधला कडक दांडा काढून टाका. हातानी सहज कुस्करता येतो. पूर्वी पाट्यावर ठेचून घ्यायचे. फूड प्रोसेसर मध्ये पाणी न टाकता भरड वाटून घेऊ शकता. पण अगदी त्याच वाटण करू नका.
या भाजीसाठी फणसाचा २ कप चुरा वापरला आहे. उरलेला डब्यात घालून डीप फ्रीझरला ठेवा. त्याचे वडे कसे करायचे नंतर ते पाहू.
साहित्य:
- उकडून बारीक केलेला फणस - २ कप
- मोड आणून सोललेले वाल- १/२ कप
- चिरलेला कांदा- १/२ कप
- ठेचलेला लसूण- ५ ते ६ पाकळ्या
- घरगुती मसाला किंवा मालवणी मसाला- ३ टीस्पून
- गोडा मसाला- १ टीस्पून
- राई- १ टीस्पून
- जीरे- १/२ टीस्पून
- हळद- १/२ टीस्पून
- हिंग- १/२ टीस्पून
- कोकम- २ ते ३
- गूळ- १/२ टीस्पून
- तेल- ४ टेबलस्पून
- खवलेले ओले खोबरे- १/४ कप
- बारीक चिरलेली कोथिम्बिर - १/४ कप
- मीठ- चवीनुसार
कृती:
- एका कढईत तेल गरम करून राई टाका, ती तडतडल्यावर जीरे, लसूण, कांदा टाकून परता.
- कांदा गुलाबी झाल्यावर हळद, हिंग आणि मसाला टाकून परता.
- त्यात मोडाचे वाल टाकून परता. थोडे पाणी घाला, झाकण ठेऊन ५ मिनिटे शिजवा.
- नंतर त्यात चुरलेला फणस, मीठ, गोडा मसाला टाकून छान एकत्र करा. लागल्यास थोडेसे पाणी टाका. मंद आचेवर १० ते १५ मिनिटे शिजवा. मधून मधून हलवत रहा.
- वाल आणि भाजी शिजल्यावर गूळ आणि कोकम टाका. छान एकत्र करून परतावा. झाकण ठेऊन एक वाफ काढा.
- खोबर आणि कोथिम्बिर टाकून गरमागरम तांदुळाच्या भाकरी किव्हा चपाती सोबत वाढा.
टीपा:
- मालवणी मसाला उपलब्द्ध नसेल तर (२ टीस्पून मिरची पूड + १ टीस्पून गोडा किंव्हा गरम मसाला) वापरावा.
- भाजीत वालाच्या एवजी बारीक लाल चवळी, काळे वाटाणे, अख्खे मसूर किंव्हा चण्याच्या डाळीचा वापर करता येईल. पण लक्ष्यात घ्या कि वरील प्रत्येक कडधान्याला शिजायला वेगवेगळा वेळ लागतो. लाल चवळी किंव्हा काळे वाटाणे वापरायचे असतील ते आधीच उकडून घ्यावे लागतात.
- वाल वापरणार नसाल तर गूळ आणि कोकम वापरायची आवश्यता नाही.
- पण ज्यांना जराश्या गोडसर भाज्या आवडतात त्यांनी गूळ वापरायला काही हरकत नाही.
No comments:
Post a Comment
आपल्या प्रतिसादाने नवीन गोष्टी करण्यास उत्साह मिळतो. आपला अभिप्राय, सुचना आम्हाला ज़रूर कळवा. आपल्या प्रेमाचा वर्षाव असाच कायम राहो.