Read this recipe in English....... click here.
साहित्य:
- शिजवलेला (किंव्हा शिळा) भात - १ कप
- उकडलेले मोडाचे मुग- १/२ कप
- चिरलेला कांदा- १/२ कप
- चिरलेली सिमला मिरची - १/४ कप
- जिरे- १/२ टीस्पून
- हळद- १/२ टीस्पून
- हिंग- १/४ टीस्पून
- लाल मिरची पूड- १ टीस्पून
- गरम मसाला- १/२ टीस्पून
- तेल- २ टेबलस्पून
- मीठ चवीप्रमाणे
- कोथिंबीर आणि टोमाटो चकत्या सजावटीसाठी
कृती:
- भाताची शीते हलक्या हाताने मोकळी करून घ्यावी.
- एका कढई मध्ये तेल गरम करून जिरे, शिमला मिरची, कांदा गुलाबी रंगावर परतून घ्यावा. नंतर त्यात हळद, हिंग, मिरची पूड, मुग टाकून १-२ मिनिट परतून घ्यावा. त्यात भात आणि मीठ टाकून छान एकत्र करून झाकण लाऊन एक वाफ द्यावी.
- कोथिम्बिर आणि टोमाटोने सजून गरमागरम वाढा.
No comments:
Post a Comment
आपल्या प्रतिसादाने नवीन गोष्टी करण्यास उत्साह मिळतो. आपला अभिप्राय, सुचना आम्हाला ज़रूर कळवा. आपल्या प्रेमाचा वर्षाव असाच कायम राहो.