Thursday, May 23, 2013

Phanasache Vade/Aambode (कच्च्या फणसाचे वडे/आंबोडे)

कोकणात कच्च्या फणसापासुन अनेक पदार्थ केले जातात. त्यात मी अजून एका पदार्थाची भर टाकली आहे. दक्षिण कोकणात याला 'आंबोडे' म्हणतात. फरक एवढाच की मी त्यात कच्चा फणस घातला आहे. तसेच ते तळलेले (डीप फ्राय केलेले) असतात, मी शालो फ्राय केलेत आणि थोडेफार बदल केले आहेत.


Read this recipe in English... click here.

साहित्य:
  • कच्चा फणस ( सोलून उकडलेला व कुस्करलेला )- १ १/२  कप
  • चणा डाळ - १/२ कप
  • जिरे- २ टीस्पून
  • धणे- १/४  टीस्पून
  • हिरव्या मिरच्या - ६ ते ८
  • चिरलेली कोथिम्बिर- १/२ कप
  • कॉर्न फ्लोअर- २  टेबलस्पून
  • हळद- १/२  टीस्पून
  • हिंग- १/४  टीस्पून
  • चाट मसाला- १  टीस्पून
  • आमचूर- १/२  टीस्पून
  • मीठ- चवीप्रमाणे
  • तेल - २ टेबलस्पून
पूर्वतयारी:
  • हाताला आणि सुरीला तेल लाऊन घ्या. कापताना खूप चीक बाहेर येतो, म्हणून हि काळजी.
  • फणसाचे वरचे जाड साल काढून टाका. साधारण ३ इंचाचे तुकडे करून, लगेच पाण्यात टाका. कारण तो लगेच काळा व्हायला लागतो. नंतर पाण्यात १ चमचा तेल आणि चिमुटभर मीठ टाकून नरम होईपर्यंत ते तुकडे उकडून घ्या. कुकर मध्ये सुद्धा  उकडले तरी चालतील. २ शिट्ट्या घ्याव्यात.
  • मधला कडक दांडा काढून टाका. हातानी सहज कुस्करता येतो. पूर्वी  पाट्यावर ठेचून घ्यायचे. फूड प्रोसेसर मध्ये पाणी न टाकता भरड वाटून घेऊ शकता. पण अगदी त्याच वाटण करू नका.



कृती:
  • चण्याची डाळ ४-५ तास भिजत घाला. नंतर उपसून ठेवा.
  • कुस्करलेला फणस फूड प्रोसेसर मधून पाण्याशिवाय बारीक करून घ्या किंवा एकदम बारीक चिरा. 
  • चण्याची डाळ, जिरे, धणे, कोथिम्बिर, मिरची एकत्र पाणी न घालता वाटून घ्या.
  • फणस, वाटलेली डाळ. हळद, हिंग, आमचूर, मीठ आणि कॉर्न फ्लोअर एकत्र करून मळून घ्या आणि त्याचे छोटे छोटे वडे तयार करा. 
  • थोड्याश्या तेलावर शिजेपर्यंत किंवा १५ मिनिटे परतून (shallow  fry ) घ्या. 
  • पुदिन्याच्या चटणीबरोबर गरमागरम वाढा.

टीप: 

No comments:

Post a Comment

आपल्या प्रतिसादाने नवीन गोष्टी करण्यास उत्साह मिळतो. आपला अभिप्राय, सुचना आम्हाला ज़रूर कळवा. आपल्या प्रेमाचा वर्षाव असाच कायम राहो.