झटपट होणारे रुचकर सँडविच
Read this recipe in English........ click here.
साहित्य:
कृती:
टीपा:
Read this recipe in English........ click here.
साहित्य:
- ब्रेड स्लाईस - १ पॅकेट (आपण ब्राऊन ब्रेड वापरू शकता)
- बटर/लोणी - आवश्यकतेनुसार
- बटाटे, उकडडून सोललेले - 2 मध्यम
- स्वीट कॉर्नचे दाणे, उकडलेले - १/२ कप
- गाजर, किसुन किंवा बारीक चिरून - १/२ कप
- कांदा, चिरून- १/२ कप
- सिमला मिरची, चिरून- १/२ कप
- आइसबर्ग लेट्युस किंव्हा ताजा छोटा कोबी, चिरून- १ कप
- लसूण, बारीक चिरून- १ टेस्पून
- ऑलिव्ह तेल- १ टिस्पून (ऐच्छिक)
- मिरपूड - 2 टिस्पून किंवा आपल्या आवडीनुसार
- एगलेस मेयोनिझ - ६ टेबलस्पून किंवा आपल्या आवडीनुसार
- मीठ- चवीनुसार
कृती:
- एका वाडग्यामध्ये सारणाचे सर्व साहित्य एकत्र करा आणि चांगले मिक्स करा.
- दोन ब्रेड स्लाईसच्या मध्ये सारण भरून नोंस्तिक तव्यावर बटर सोडून खरपूस भाजा. किंव्हा सँडविच मेकर वापरा.
- टोमॅटो केचपबरोबर गरमागरम सर्व्ह करावे.
टीपा:
- सँडविच टोस्ट केले (भाजले) नाही तरी चालेल, असे देखील चांगले लागते.
- आपण आपल्या वैयक्तिक आवडीनुसार इतर भाज्या घालु शकता किंव्हा वगळु शकता. भाज्या प्रमाण देखील लवचिक आहे.
- आइसबर्ग लेट्युस हा सहज उपलब्ध नाही. त्यामुळे कोबी वापरू शकता, चवीत फारसा फरक पडत नाही.
- तिखट आवडत असेल तर चिली फ्लेक्स टाकु शकता.
No comments:
Post a Comment
आपल्या प्रतिसादाने नवीन गोष्टी करण्यास उत्साह मिळतो. आपला अभिप्राय, सुचना आम्हाला ज़रूर कळवा. आपल्या प्रेमाचा वर्षाव असाच कायम राहो.