आज गणेश जयंती निमित्त बाप्पाला नैवेद्य ……
साहित्य :
कृती :
साहित्य :
- खवा/मावा - १ कप
- बारीक साखर- १/२ ते ३/४ कप
- वेलची पूड- १/२ टीस्पुन
- साजूक तूप- मोदकाच्या मोल्डला लावण्यासाठी
कृती :
- खवा मळून घेवून त्यात साखर मिसळावी .
- जाड बुडाचे पातेले किंव्हा नॉन-स्टिक प्यान घेवून त्यात खवा घालून मंद गॅस वर ढवळत राहावे. साखर पूर्ण विरघळेल आणि खवा पातळ होऊ लागेल.
- मधून मधून गोळी होत आली का पहावी, गोळी करताना मावा बोटाला चिकटता कामा नये. गोळी झाली कि गॅस बंद करून पातेले खाली उतरावे.
- वेलची पूड घालावी व नीट मिक्स करावे.
- मावा थंड होवू दयावा.
- छोटे मोदकाचे मोल्ड बाजारात मिळतात. त्यात थोडेसे तूप लावून खवा दाबून भरावा.
- अश्या प्रकारे सर्व मोदक करून घ्यावेत.
No comments:
Post a Comment
आपल्या प्रतिसादाने नवीन गोष्टी करण्यास उत्साह मिळतो. आपला अभिप्राय, सुचना आम्हाला ज़रूर कळवा. आपल्या प्रेमाचा वर्षाव असाच कायम राहो.