Read this recipe in English......click here.
साहित्य:
- सोललेली कोळंबी लहान - १/२ ते ३/४ कप
- पातीचा कांदा, चिरलेला - १ जुडी (साधारण १ किंवा १+१/४ कप)
- बारीक चिरलेला कांदा- १/४ कप (ऐच्छिक)
- लसूण, ठेचून- ६ पाकळ्या
- मालवणी मसाला किंवा घरगुती मसाला - २ ते ३ टिस्पून
- हळद- १/२ टिस्पून
- हिंग- १/४ टिस्पून
- कोकम/आमसुलं- ३ (किंव्हा १/२ कप टोमॅटो)
- तेल- ४ टेबलस्पून
- मीठ- चवीनुसार
कृती:
- कोळंबी सोला आणि आतील दोरा काढा. व्यवस्थित धुवा आणि १/२ टिस्पून मीठ आणि १/४ टिस्पून हळद लाऊन मुरत ठेवा.
- एका पॅनमध्ये तेल गरम करून व कांदा आणि लसूण परतावे. हळद, हिंग टाकून एक मिनिट परतावे.
- मसाला आणि कोळंबी घालून छान परतून घ्यावी.
- चिरलेला पातीचा कांदा आणि मीठ घालावे. आणि नीट एकत्र करून परतून घ्यावे.
- झाकण ठेवुन भाजी मंद आचेवर साधारण ५ मिनिटे शिजवावी. भाजीला पाणी सुटते.
- कोकम घालून जरा वेळ परतावी. म्हणजे पाणी पण सुकेल.
- तयार भाजी भाकरी किंवा आमटी भाताबरोबर सर्व्ह करावी.
टीपा:
- मी आणलेल्या पातीचे कांदे छोटे आणि कवळे होते, त्यामुळे मी थोडा कांदा वापरला आणि हिरव्या पातीसोबतच पांढरा भाग शिजायला टाकला.
- जर पातीचे कांदे मोठे आणि जून असतील तर दुसरा कांदा न वापरता लसणासोबतच चिरून फोडणीला घालावेत.
- कोलंबीच्या ऐवजी सोडे किंव्हा सुकट वापरली तरी मस्त चव येते.
No comments:
Post a Comment
आपल्या प्रतिसादाने नवीन गोष्टी करण्यास उत्साह मिळतो. आपला अभिप्राय, सुचना आम्हाला ज़रूर कळवा. आपल्या प्रेमाचा वर्षाव असाच कायम राहो.