सोप्पी, साधी आणि चवीला अतिशय रुचकर….
Read this recipe in English.......click here.
साहित्य:
कृती:
Read this recipe in English.......click here.
साहित्य:
- तुरीचे दाणे - १ १/२ कप (५०० ग्रॅम तुरीच्या शेंगापासून)
- टोमॅटो, बारीक चिरून- १ मध्यम
- मोहरी- १ टिस्पून
- जिरे - १/२ टिस्पून
- हळद - १/२ टिस्पून
- हिंग- एक चिमूटभर
- कोल्हापुरी चटणी मसाला/कांदा-लसुण मसाला- 2 ते 3 टिस्पून
- तेल - 3 टेबलस्पून
- कोथिंबीर - एक मूठभर
- ओले खोबरे, खवुन- २ टिस्पून
- मीठ - चवीनुसार
कृती:
- पॅन मध्ये तेल गरम करावे. मोहरी, जिरे, हळद आणि हिंग घालून फोडणी करावी.
- त्यात तुरीचे दाणे घालावेत. लगेच पॅनवर झाकण ठेवा कारण दाणे फोडणीत टाकल्यावर उडू लागतात. मंद आचेवर २-३ मिनिटे शिजू द्यावे.
- नंतर टोमॅटो, कोल्हापुरी मसाला, मीठ घालून चांगले मिक्स करावे.
- थोडे पाणी शिंपडा आणि खोबरे आणि कोथिंबीर घालून मिक्स करावे.
- झाकण ठेऊन मंद आचेवर ५ मिनिटे शिजू द्यावे. उसळ तयार आहे.
- पोळी किंवा भाकरी सोबत हि चवदार उसळ सर्व्ह करावी.
- किंवा ... प्लेट मध्ये थोडीशी उसळ घेऊन त्यावर चिरलेला टोमॅटो, कांदा, कोथिंबीर, लिंबाचा रस आणि शेव टाका. एक नाश्ता म्हणून सर्व्ह करता येईल.
- कोल्हापुरी मसाला ऐवजी ( 1½ टीस्पून तिखट + 1½ टीस्पून गोडा मसाला) वापरू शकता.
- फोडणीत हवा असल्यास चिरलेला कांदा घालू शकता.
- मटार, ओला हरभरा, वाल/पावटा दाणे वापरून अश्या प्रकारची उसळ करू शकता.
No comments:
Post a Comment
आपल्या प्रतिसादाने नवीन गोष्टी करण्यास उत्साह मिळतो. आपला अभिप्राय, सुचना आम्हाला ज़रूर कळवा. आपल्या प्रेमाचा वर्षाव असाच कायम राहो.