संध्याकाळी चहासोबत खाण्यासाठी चविष्ट आणि हेल्दी कटलेट ………….
Read this recipe in English......click here.
साहित्य:
कृती:
Read this recipe in English......click here.
साहित्य:
- पालक,चिरून - १+१/२ कप
- बटाटे, उकडून कुस्करलेले- १ कप (साधारण २ मोठे)
- रताळे, उकडून कुस्करलेले- १/२ कप (साधारण १)
- हिरव्या मिरच्या- ३ ते ४
- लसुण- ६ पाकळ्या
- जिरे पूड- १/२ टिस्पून
- चाट मसाला- १ टिस्पून
- कॉर्न फ्लोअर - १ टेबलस्पून
- मीठ-चवीनुसार (चाट मसाल्यात मीठ असते त्यानुसार मीठ घाला)
- तेल- आवश्यकतेनुसार
कृती:
- बटाटे आणि रताळे उकडून, सोलून कुस्करावे. (रताळे नसेल तर फक्त बटाटा वापरला तरी चालेल, चिमुटभर साखर घाला.)
- लसूण व हिरव्या मिरच्या भरडसर वाटून घ्याव्यात.
- पालक निवडून, धुवुन व बारीक चिरून घ्यावा.
- तेल सोडून वरील सर्व साहित्य एकत्र करा आणि चांगले मिक्स करा. मळुन गोळा तयार करा. (चिकट वाटत असेल तर ब्रेडचा चुरा घालावा.)
- लहान गोळे करून हव्या त्या आकाराचे कटलेट बनवा.
- एका पॅनमध्ये थोडेसे तेल गरम करून शालो फ्राय करावे.
- तयार झाल्यावर वरून थोडासा चाट मसाला भुरभुरावा आणि चिंचगूळाची चटणी किंवा टोमॅटो केचपबरोबर गरम वाढावेत.
Purva, तळण्यासाठी म्हणण्याऐवजी तेलात परतण्यासाठी म्हटलं तर शॅलो फ्राय आहे हे समजेल. मी तळण्यासाठी वाचल्यावर पुढचं वाचणार नव्हते पण वर हेल्दी लिहिलेलं होतं म्हणून पुन्हा वाचलं :-). आता करुन पाहिन.
ReplyDelete