आवळा सुपारी हि मुखशुद्धी आणि आरोग्यासाठी खूप चांगली आहे.
संशोधनात असे आढळले आहे की चांगल्या गुणधर्माचे व संत्र्यापेक्षा जास्त व्हिटॅमिन "सी" आवळ्यात आहेत . याच्या सेवनाने पचनशक्ती चांगली वाढते. आयुर्वेदात आवळ्याला अत्यंत गुणकारी म्हटले आहे.
Read this recipe in English........click here.
साहित्य:
कृती:
टिपा :
संशोधनात असे आढळले आहे की चांगल्या गुणधर्माचे व संत्र्यापेक्षा जास्त व्हिटॅमिन "सी" आवळ्यात आहेत . याच्या सेवनाने पचनशक्ती चांगली वाढते. आयुर्वेदात आवळ्याला अत्यंत गुणकारी म्हटले आहे.
Read this recipe in English........click here.
साहित्य:
- आवळा - १/२ किलो
- मीठ किंवा शेंदेलोण/सैंधव मीठ- १ टेबलस्पून
- आले रस - १/४ कप (साधारण. २५-३० ग्रॅम आल्यापासून)
कृती:
- आवळे धुवून आणि प्रेशर कुकरच्या भांड्यात ठेवावेत. त्या भांड्यात अजिबात पाणी घालायचे नाही. (पण कुकरमध्ये पाणी घालायला विसरू नका)
- शिट्टी न लावता २०-२५ मिनीटे त्यांना शिजवावे. (म्हणजे आवळ्यांना थेट पाण्याचा संपर्क नको, वाफेवर शिजायला हवेत.) मऊ होई पर्यंत शिजले पाहिजेत. अगदी खूप मऊ नको. बोटाने दाबल्यास लगदा न होता त्यांचा आकार कायम राहून उघडले पाहिजेत म्हणजे आपण सहजपणे आतील बी काढू शकतो.
- त्यांना थंड होऊ द्या. त्याच्या बिया काढा. पाकळ्यांसारखे त्याचे भाग दिसतील. हवे तर तसेच ठेवा किंव्हा त्याचे अजून लहान तुकडे करा. लहान तुकडे लवकर सुकतात.
- कमीतकमी पाणी वापरून आले मिक्सरमध्ये बारीक वाटा किंवा बारीक किसणीवर आले किसून घ्या, पिळून किंव्हा गाळून त्याचा रस काढा.
- मोठ्या बाउलमध्ये आवळ्याचे तुकडे, मीठ आणि आले रस एकत्र करा. १ तास मुरु द्या नंतर मोठ्या ताटात पसरवून कडक उन्हात वाळत घाला.
- कडक उन्हात ५ ते ८ दिवस वाळवा. तुकडे पूर्णपणे सुकायला हवे आहेत.
- काचेच्या किंवा प्लॅस्टिकच्या हवाबंद डब्यात/बरणीत ठेवा.
टिपा :
- सुकवण्यापूर्वी आवळ्यावर २ टिस्पून जिरे पूड घालून हळूहळू चोळा. जिऱ्याचा स्वाद छान लागतो.
- अजून आरोग्यपूर्ण बनवण्यासाठी, आवळ्यावर १/२ टिस्पून हिंग घालू शकता.
- इथे आवळे उकडून घेतले आहेत. पण त्याऐवजी कच्चे सुद्धा वापरू शकतो. त्यासाठी आवळे आणि आले किसून घ्या. त्यांना मीठ आणि जिरे पावडर चोळा आणि कडक उन्हात वाळवा.
Mast aahe tumi youtube var video bana khup hit hoil . Aajun aawalyache kay kay yet te pan sanga
ReplyDelete