मासे तळणे खूपच सोप्प असतं आणि ते खूप चवदार लागतात.
Read this recipe in English......click here.
साहित्य:
कृती:
टिपा:
Read this recipe in English......click here.
साहित्य:
- पापलेट - १ मध्यम आकाराचे (किंव्हा साधारण ६-७ तुकडे)
- हळद - १/२ टिस्पून
- हिंग - १/४ टिस्पून
- घरगुती मसाला किंवा मालवणी मसाला - 2 ते 3 टिस्पून करण्यासाठी (मालवणी मसाला बाजारात सहज उपलब्ध आहे.)
- लसूण पाकळ्या- ८
- कोकम/आमसूल- ६
- मीठ- चवीनुसार
- तेल- आवश्यकतेनुसार
कृती:
- कमीतकमी पाणी वापरून लसूण आणि कोकम यांचे गुळगुळीत वाटण करावे. (या साठीचे पर्याय खाली वाचा)
- हव्या त्या आकारात मासे कापा. त्याच्या पोटातील घाण व कल्ले काढून टाका.
- माश्याचे तुकडे २ वेळा काळजीपूर्वक धुवून घ्या.
- मीठ, मसाला, हळद, हिंग, कोकम - लसूण पेस्ट एकत्र करून माश्याला हळूहळू चोळा. कमीतकमी अर्धा तास मसाल्यात मुरत ठेवा.
- तवा तापत ठेवा, तव्यावर २ टेबलस्पून तेल घालून पसरवा. गरम तव्यावर मध्यम ते मंद आचेवर मासे तळा. जरुरीनुसार बाजूने तेल सोडा
- दोन्ही बाजूनी खरपूस तळा.
- भाकरी, कालवण आणि भात बरोबर गरम गरम सर्व्ह करा.
टिपा:
- आपण कोणत्याही प्रकारचे मासे किंवा कोळंबी या प्रकारे तळू शकता.
- कोकमाऐवजी चिंचेचा कोळ किंवा लिंबाचा रस वापरू शकता. पण अस्सल कोकणी चव कोकमच देते.
- कोकमाऐवजी कोकमाचे आगळ वापरू शकता.
- कृपया आले वापरू नका.
- मी लसूण-कोकम पेस्ट जास्त प्रमाणात करते आणि फ्रीजर मध्ये ठेवते. याची दोन कारणे आहेत.…. एक म्हणजे छोट्या प्रमाणातले वाटण मिक्सरला चांगले गुळगुळीत होत नाही. (माझी आई अजूनही कोकम-लसणाची गोळी पाट्यावर बनवते.) दुसर म्हणजे वेळेची बचत. १/२ कप लसूण आणि त्याहून थोडे कमी कोकम कमीत कमी पाणी वापरून एकत्र वाटून घ्यावे. मध्यम आकाराच्या माश्यासाठी २-३ टीस्पून पेस्ट लागेल.
- बोंबील आणि बांगडा तळायाच्या पद्धती भिन्न आहेत. मी नंतर लिहीन.
Mast
ReplyDelete