डोश्याचा एक आगळा-वेगळा प्रकार ……… मका नेहमी आपण भाजून किंवा उकडून खातो. फारफार तर काय भजी करतो. आता हे डोसे पण नक्की करून पहा. तुम्हाला नक्की आवडतील.
Read this recipe in English........click here.
साहित्य:
कृती:
Read this recipe in English........click here.
साहित्य:
- मक्याचे दाणे- २ कप (४ कणसापासून)
- बेसन- पाव कप
- बारीक रवा-२ टेबलस्पून
- हिरवी मिरची, बारीक कुटून- ३ ते ४
- आले, बारीक किसून- अर्धा इंच
- कोथिंबीर, बारीक चिरून- पाव कप
- जिरेपूड - १ टिस्पून
- हळद - १/४ टिस्पून
- हिंग- १/४ टिस्पून
- मीठ- चवीनुसार
- खायचा सोडा- चिमूटभर
- तेल- तळण्यासाठी, आवश्यकतेनुसार
कृती:
- थोडे पाणी घालून मक्याचे दाणे मिक्सरवर बारीक वाटून घ्यावेत.
- मक्याच्या पेस्टमध्ये सर्व उर्वरित साहित्य एकत्र करा व चांगले ढवळा. जरुरीनुसार पाणी घालावे. मिश्रण डोसा पिठासारखे हवे. (थोडी आंबट चव हवी असल्यास पाण्याऐवजी ताक वापरावे.)
- १५ ते २० मिनिटे मिश्रण तसेच राहू द्या.
- नॉन-स्टिक डोसा पॅन गरम करा आणि थोडे तेल तव्याला लावा.
- पॅनवर एक पळीभर मिश्रण घालावे आणि गोलाकर चमचा फिरवून त्याचा डोसा बनवावा.
- डोश्याच्या कडेने थोडे तेल सोडावे आणि डोसा दोन्ही बाजूंनी हलका तपकिरी होईपर्यंत मध्यम आचेवर शिजू द्यावा. अश्याप्रकारे सर्व उर्वरित डोसे करून घ्यावेत.
- पुदिना चटणी आणि टोमॅटो केचपबरोबर गरम डोसा सर्व्ह करा.
I tried this. The taste was good but the dosas were not crisp at all. They were breaking while fliping. The tava was hot enough. Then too it was happening. Could you please help me?
ReplyDeleteमक्याचा गुणधर्मच आहे कि पदार्थाला "crispness" आणि "binding" देणे. असो, डोसा पातळ घाला, थोडावेळ झाकण ठेवा व व्यवथित भाजून घ्या. गरम असतानाच खा, थंड झाल्यावर मऊ पडतो.
DeleteFarch chan tips dili aahe.dhabyawad.
DeleteMast
ReplyDelete