Read this recipe in English......click here.
साहित्य:
- मटण - १/२ किलो
- आल-लसुण पेस्ट - २ टीस्पून
- हळद- १ टीस्पून
- हिंग- १/२ टीस्पून
- कांदा, बारीक चिरुन- १ मोठा
- घरगुती मसाला किंव्हा मालवणी मसाला - ४ ते ६ टीस्पून (आवडीनूसार कमी जास्त वापरा, मी ५ टीस्पून वापरला आहे )
- गरम मसाला- २ टीस्पून
- तेल- ६ टे.स्पून
- दालचिनी- १ इंचाचा तुकडा
- तमालपत्र- ३
- भाजलेल्या सुक्या खोबऱ्याचे वाटण- २ ते ३ टेबलस्पून
- मीठ - चवीनुसार
कृती:
- मटण स्वच्छ धुउन आणि कापून घ्या. मटणाला हळद, हिंग, आल-लसूण पेस्ट आणि मीठ लाऊन व्यवस्थित चोळा. कमीतकमी अर्धा तास मुरत ठेवा.
- कढई मध्ये तेल गरम करुन त्यात दालचिनी, तमालपत्र आणि कांदा टाकून गुलाबी होइस तो पर्यंत परता.
- आता मटन घालुन चांगले ५ मिनिटे मोठ्या आचेवर खमंग परता.
- मटणात थोडेसे पाणी टाकून व्यवस्थित हलून घ्या.
- झाकणावर पाणी ठेऊन मध्यम आचेवर १५- २० मिनिटे शिजू द्या. मधेमधे हलवत रहा. मटण पूर्णपणे शिजऊ नका, साधारणपणे ७५% शिजले पाहिजे. (प्रेशर कुकरचा वापर केला तरी चालेल.)
- मग मालवणी मसाला, गरम मसाला आणि वाटण टाकून व्यवस्थित हलून घ्या. २० ते २५ मिनिट किंव्हा मटण शिजेपर्यंत मंद आचेवर झाकण लाऊन शिजवुन घ्या.
- नंतर मोठ्या आचेवर २-३ मिनिटे परतून घ्या. म्हणजे मटण छान फ्राय होऊन सुक्क होईल.
- गरमागरम भाकरी, चपाती, आंबोळी किंव्हा वड्यासोबत वाढा.
टिप:
- हे मटन कुकरमध्ये पण शिजवता येईल. पण बाहेर केलेल्या मटणाची चव काही न्यारीच असते.
- ह्या पद्धतीने कोंबडी पण शिजवता येईल. पण लक्ष्यात ठेवा, कोंबडी शिजायला कमी वेळ लागतो.
- खास मालवणी चवीसाठी हाच गरम मसाला (इथे क्लिक करा) वापरा.
Can U Plz Provide the detailed recipe for Suka Khobara Vatan?
ReplyDeletePlz refer this link: Suke Khobare Vatan
Delete