ओल्या नारळाचा वापर करून केलेले कोकणाची मधुरता असलेले रवा लाडू ........
Read this recipe in English.
साहित्य:
कृती:
Read this recipe in English.
साहित्य:
- बारीक रवा- १ कप
- ओले खवलेले खोबरे- १ कप
- पाणी- १/२ कप
- साखर- ३/४ कप ते १ कप
- साजूक तूप- १/४ कप
- वेलची पूड- १/२ टीस्पून
- चारोळ्या- १ टेबलस्पून
- मनुका/बेदाणे- १ टेबलस्पून
- बदाम,काजू,पिस्ता यांचे काप- १ टेबलस्पून (ऐच्छिक)
कृती:
- रवा मंद ते मध्यम आचेवर तूपावर खमंग, गुलाबी रंगावर भाजून घ्यावा.
- त्यात खोबरे टाकून अजून ४-५ मिनिटे मंद ते मध्यम आचेवर भाजून घ्यावे. रवा चांगला फुलाला पाहिजे नाहीतर लाडू कच्चट लागतात.
- रवा-खोबरे भाजून झाले की त्यात सर्व ड्राय फ्रुट्स घालावेत व अजून थोडावेळ परतावे.
- पातेल्यात साखर आणि पाणी एकत्र करून उकळावे. साखर वितळली की ३-४ मिनिटात पाक (एकतारी पाक हवा) तयार होतो.
- गॅस बंद करून त्यात रवा व वेलची पूड घालावी.
- मिश्रण घट्ट होईपर्यंत सतत ढवळत रहावे. त्यामुळे गुठळ्या होणार नाहीत.
- २-३ तासांनी मिश्रण आळून लाडू वळण्याजोगे होईल. मग लाडू वळावेत.
- लाडू जास्त दिवस ठेऊ नयेत. ओल्या खोबऱ्यामुळे लाडू लवकर खराब होतात. ५-६ दिवसांपेक्षा जास्त राहिले तर फ्रीज मध्ये ठेवावेत.
No comments:
Post a Comment
आपल्या प्रतिसादाने नवीन गोष्टी करण्यास उत्साह मिळतो. आपला अभिप्राय, सुचना आम्हाला ज़रूर कळवा. आपल्या प्रेमाचा वर्षाव असाच कायम राहो.