मठरी हा पंजाबी लोकांचा आवडता पदार्थ आहे. ते लोक आंब्याच्या लोणच्याबरोबर याची मजा लुटतात. आपण दिवाळीसाठी तिखट पुरीला किंव्हा खाऱ्या शंकरपाळीला बदल म्हणून या मठरी करू शकतो.
Read recipe in English......click here.
साहित्य:
कृती:
Read recipe in English......click here.
साहित्य:
- मैदा- २ कप
- वनस्पती तूप (डालडा)- १/२ कप
- जीरे, जाडसर कुटून-१/२ टीस्पून
- काळे मीरे, जाडसर कुटून-१ टीस्पून
- कलौन्जी (कांद्याचे बी)- १ टीस्पून
- मीठ- चवीप्रमाणे
- तेल- तळण्यासाठी आवश्यकतेनुसार
कृती:
- मैदा चाळून घ्यावा.
- त्यात सर्व मसाले आणि मीठ घालावे.
- तूप कडकडीत तापऊन त्याचे मोहन वरील मिश्रणात घालावे.
- थोडस थंड झाल्यावर हाताने हळूहळू चोळून तूप मैद्यात सारखे मिसळून एकजीव करावे.
- मग लागेल तसे थोडे थोडे पाणी टाकून मैदा घट्ट भिजऊन घ्यावा.
- थोडा वेळ तसाच झाकून ठेवावा.
- नंतर पुन्हा चांगले मळून घेऊन त्याच्या छोट्या लाट्या कराव्यात.
- जाडसर पुऱ्या लाटून घ्याव्यात व काट्याने त्यावर टोचे मारावेत. (नाहीतर पुरीसारख्या फुगतील आणि नंतर मऊ होतील.) लांबडे आयताकृती तुकडे पण करता येतील.
- तेल तापून घ्या. थोड्या थोड्या पुऱ्या मंद ते मध्यम आचेवर सोनेरी रंगावर तळा. तरच त्या खुसखुशीत होतील.
- थंड झाल्यावर हवाबंद डब्यात ठेवा.
No comments:
Post a Comment
आपल्या प्रतिसादाने नवीन गोष्टी करण्यास उत्साह मिळतो. आपला अभिप्राय, सुचना आम्हाला ज़रूर कळवा. आपल्या प्रेमाचा वर्षाव असाच कायम राहो.