मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा
तीळगूळ घ्या गोड गोड बोला !!
Read this recipe in English........click here.
साहित्य:
कृती:
टीप: भाजताना काहीही जळऊ नका कारण तीळगुळात जर काळा भाग असेल तर चांगला दिसत नाही.
तीळगूळ घ्या गोड गोड बोला !!
Read this recipe in English........click here.
साहित्य:
- तीळ (पॉलीशचे) - ५०० ग्रॅम
- चिक्कीचा गूळ- ५०० ग्रॅम
- शेंगदाणे- २०० ग्रॅम
- सुके खोबरे- १ वाटी/ कवड
- वेलची पूड- २ टिस्पून
- साजूक तूप- २ टिस्पून
- सुक्या खोबऱ्याच्या वाटीची बाहेरची बाजू किसून त्याचा काळा भाग काढून टाका. नंतर किसा, त्यामुळे पांढरे शुभ्र खोबरे मिळेल. मंद आचेवर नकरपवता हलकेसे भाजून घ्या.
- शेंगदाणे भाजून, सोलून घ्या. भरड कुट करा. मी त्यासाठी लाटणे वापरते.
- तीळ खमंग भाजून घ्यावेत.
- तीळ, शेंगदाण्याचा कुट, खोबरे आणि वेलचीपूड परातीत एकत्र करा. चांगले मिसळून ठेऊन द्या.
- जाड बुडाच्या कढईत किंव्हा नॉन-स्टिक पॅन मध्ये, २ टेस्पून तूप गरम करून गूळ घालावा. आच मध्यम असावी.
- सतत ढवळत राहावे, गूळ पूर्ण पातळ झाला कि थोड्या वेळाने तो फेसाळतो. नंतर त्याला उकळी येउन रंग बदलू लागेल, साधारण लालसर होऊन गुळाचा छान वास येऊ लागेल. आच कमी असावी.
- पाक तयार झाला आहे कि नाही हे पाहण्यासाठी गूळाचा जरासा पाक चमच्याने बाहेर काढून अंदाज घ्यावा. एकतारी पाक तयार व्हायला हवा. किंव्हा त्या पाकाची कडक गोळी झाली पाहिजे तर पाक तयार आहे असे समजावे.
- पाक झाला की त्यात तीळ, शेंगदाण्याचा कुट, खोबरे आणि वेलचीपूड चे मिश्रण घालून निट ढवळावे, आणि गरम असतानाच लाडू वळावेत, नाहीतर लाडू वळले जात नाहीत. लाडू वळताना हाताला थोडे तूप लावावे ज्यामुळे गरम मिश्रण हाताला चिकटणार नाही.
- मिश्रण थंड होऊ लागले तर जाड तवा गरम करा. नंतर गॅसची आच मंद करून तव्यावर मिश्रणाची कढई ठेवा. तिळगुळाचे मिश्रण सैल होऊ लागेल.
- सर्व लाडू वळून घ्या व त्यांना थंड होऊ द्या. नंतरच हवाबंद डब्यात भरून ठेवा.
टीप: भाजताना काहीही जळऊ नका कारण तीळगुळात जर काळा भाग असेल तर चांगला दिसत नाही.
No comments:
Post a Comment
आपल्या प्रतिसादाने नवीन गोष्टी करण्यास उत्साह मिळतो. आपला अभिप्राय, सुचना आम्हाला ज़रूर कळवा. आपल्या प्रेमाचा वर्षाव असाच कायम राहो.