थंडी सुरु झाली की बाजारात ओली हळद यायला लागते. आलंही छान मिळत.
नेहमीच्या लोणच्यापेक्षा काहीतरी वेगळ लोणचं, जे आरोग्यासही चांगले आहे. मग नक्की करून बघा.
Read this recipe in English.....click here.
साहित्य:
कृती:
टीपा :
नेहमीच्या लोणच्यापेक्षा काहीतरी वेगळ लोणचं, जे आरोग्यासही चांगले आहे. मग नक्की करून बघा.
Read this recipe in English.....click here.
साहित्य:
- ओली हळद , बारीक चिरून- १ १/२ कप
- आले, बारीक चिरून- १ कप
- हिरव्या मिरच्या, बारीक चिरून- १/२ कप
- मीठ- ४ टीस्पून किंवा चवीनुसार
- लिंब- ३ ते ४
- मेथी दाणे- ८ ते १० दाणे
- मोहोरी- १/२ कप
- तेल- १ कप किंवा गरजेनुसार
- हिंग- १ टीस्पून
कृती:
- मी काही वेळा हळद व आंबे हळद अश्या दोन प्रकारची हळद वापरून सुद्धा हे लोणचे केले आहे. आंबे हळदीने छान आंबट चव येते, पण चाखून पाहावी लागते आधी कारण आंबे हळद कधीकधी कडू असते.
- मोहोरी मंद आचेवर भाजून घ्यावी. करपवू नये अन्यथा कडवट होते. खलबत्त्यात कुटून घ्यावी. खलबत्ता नसेल तर मिक्सरवर भरड दळावी.
- ओली हळद व आले स्वच्छ धुवून सोलावे, कोरडी करून चिरून घ्यावे. हिरव्या मिरच्या बारीक चिरून घ्याव्यात.
- एका वाडग्यात चिरलेली हळद, चिरलेले आले, चिरलेल्या हिरव्या मिरच्या, लिंबाचा रस व मीठ असे सर्व एकत्र करावे. छान मिक्स करावे. रात्रभर किंव्हा ५-६ तास तसेच ठेवावे.
- दुसऱ्या दिवशी त्यात कुटलेली मोहोरी टाकून मिक्स करावे.
- कढल्यात १ टेबलस्पून गरम करून त्यात मेथी दाणे परतून घ्यावेत. गॅस बंद करून हिंग टाकावी. हिंग फुलला पाहिजे. हि फोडणी लोणच्यावर ओतून छान मिक्स करावे.
- स्वच्छ, सुक्या व हवाबंद काचेच्या बरणीत भरून ठेवावे.
- छोट्या पातेल्यात तेल वाफ/धूर येईपर्यंत गरम करावे. तेल पूर्ण थंड झाल्यावर लोणच्याच्या बरणीत ओतून खाली-वर हलवावे.
- लोणचे बरणीत भरल्यावर वर तेलाचा थर हवा नाहीतर बुरशी येते. (तेल कमी पडल्यास तेल वाढवावे. कच्चे तेल लोणच्यात कधीही घालू नये. तेल गरम करून थंड झाल्यावरच लोणच्यात टाकावे.) हे लोणचे मुरायला जरा जास्त वेळ लागतो. अंदाजे १ ते दीड महिना लागेल, नाहीतर कडू लागत.
टीपा :
- हळद व आले सोलून किसून घेतली तरी चालते. मग मिरच्याही अगदी बारीकच चिराव्यात.
- मी तयार केलेले हे लोणचे फार तिखट नाही. कारण मला हळदीचा व आल्याचा खरा स्वाद अनुभवायाचा होता. पण ज्यांना तिखट आवडत असेल तर त्यांनी मिरच्यांचे प्रमाण वाढवायला हरकत नाही.
- तुम्हाला जर लोणच्यात जास्त तेल आवडत नसेल तर लोणचे मुरल्यावर वरचे तेल बारीक (चहासाठी वापरतो ती) प्लास्टिकच्या गाळणीने गाळुन काढावे. पण मग हे लोणचे फ्रीझमध्येच ठेवावे लागेल. (हे तेल आचारी प्रकारच्या भाज्या बनवण्यास वापरू शकता.)
- आपल्या नेहमीच्या मीठाऐवजी सेन्देलोण (सैन्धव मीठ ) वापरू शकता.
- मी २५० ग्रॅम ओली हळद आणली होती. साले काढल्यावर व खराब झालेला भाग काढून टाकल्यावर मला १ १/२ कप हळदीचे तुकडे मिळाले. कदाचित तुम्हाला यापेक्षा जास्त किंव्हा कमी चांगले तुकडे मिळू शकतात, तुम्हाला कशी हळद मिळते यावर ते अवलंबून आहे.
No comments:
Post a Comment
आपल्या प्रतिसादाने नवीन गोष्टी करण्यास उत्साह मिळतो. आपला अभिप्राय, सुचना आम्हाला ज़रूर कळवा. आपल्या प्रेमाचा वर्षाव असाच कायम राहो.