झटपट होणारं खुसखुशीत चविष्ट उपासाच थालीपीठ, माझी मुलगी तर या थालीपीठासाठीच उपवास करायला तयार असते......
Read this recipe in English..... click here.
उपवासाची भाजणी :
साबुदाणा - १ किलो
वरी तांदूळ - १ किलो
राजगिरा - ५०० ग्रॅम
जीरे - १०० ग्रॅम
साबुदाणा, वरी तांदूळ, आणि राजगिरा गुलाबी रंग येईस्तोवर मंद आचेवर वेगवेगळे भाजावे.
जीरे न भाजताच घालावे.
सर्व जिन्नस एकत्र करावे. मिक्सरमध्ये बारीक करावे किंवा गिरणीतून सरसरीत दळून आणावे.
उपवासाची भाजणी बाजारात पण मिळते. त्यापासून तुम्ही उपवासाचा उपमा, वडे बनऊ शकता.
आता आपण यापासून थालीपीठ कसे बनवायचे ते पाहू ……….
साहित्य:
- उपवासाची भाजणी - १ १/२ कप
- उकडलेले बटाटे- २ मध्यम
- शेंगदाण्यांचा कूट- २ ते ४ टेबलस्पून
- मिरची पूड- १ टीस्पून
- साखर- १/२ टीस्पून
- मीठ- चवीनुसार
- पाणी किंव्हा ताक - १/२ कप
- तेल किंव्हा तूप तळण्यासाठी - आवश्यकतेनुसार
कृती:
उकडलेले बटाटे नीट कुस्करून घ्यावे.
भाजणी, बटाटे, मिरची पूड, शेंगदाण्याचा कूट, साखर आणि चवीपुरते मीठ घालून नीट मिक्स करावे.
पाणी किंव्हा ताक घालून मळून घ्यावे. मिश्रणाचे मध्यम आकाराचे गोळे करावे.
नॉनस्टीक तव्याला तेलाचा/तूपाचा हात लावून गोळे थापावे. थालिपीठाच्या मध्यभागी तूप सोडण्यासाठी एक छिद्र करावे.
छीद्रात थोडे तूप सोडावे. मध्यम आचेवर थालिपीठाला झाकण ठेवून वाफ काढावी. दोन्ही बाजूने खरपूस करून घ्यावे.
छीद्रात थोडे तूप सोडावे. मध्यम आचेवर थालिपीठाला झाकण ठेवून वाफ काढावी. दोन्ही बाजूने खरपूस करून घ्यावे.
दही किंवा लिंबाचे गोड लोणचे यांबरोबर हे थालिपीठ छान लागते.
No comments:
Post a Comment
आपल्या प्रतिसादाने नवीन गोष्टी करण्यास उत्साह मिळतो. आपला अभिप्राय, सुचना आम्हाला ज़रूर कळवा. आपल्या प्रेमाचा वर्षाव असाच कायम राहो.