या भाकरीला काही ठिकाणी कळव्याची भाकरी असेही म्हणतात. कळण्याच्या भाकरीसोबत भरपूर लाल तिखट व तेल घालून केलेली कांद्याची पीठ पेरून केलेली भाजी किंव्हा भरपूर हिरव्या मिरच्या आणि मटार घालून केलेले  वांग्याचे भरीतही छान लागते. कळण्याची भाकरी, वऱ्हाडी ठेचा आणि थंडगार मठ्ठा हा वऱ्हाडातला  आवडता बेत.
कळण्याचे पीठ :
वऱ्हाडी ठेचा :
साहित्य- १  गड्डी लसूण , १५  ते  २०  सुक्या  लाल  तिखट  मिरच्या , २  चमचे  सुके  किसलेले  खोबरे , चवीनुसार  मीठ , अर्धी   वाटी  तेल. 
कळण्याचे पीठ :
- ज्वारी -१ किलो
 - अख्खे उडीद किंव्हा अख्खे मुग-पाव किलो
 - मेथी दाणे- १ छोटा चमचा/ टीस्पून
 - जाडे मीठ- चवीनुसार / १ टीस्पून
 
एकत्र चक्कीवरून दळून आणावे
.
साहित्य:
साहित्य:
- वरील तयार पीठ- २ वाट्या
 - धने-जीरे पूड- १ चमचा
 - दही - १ वाटी
 
- प्रथम कळण्याच्या पीठामध्ये इतर सर्व जिन्नस कालवून घ्यावेत.
 - तयार पिठाची भाकरी थापून चांगाली खरपूस भाजून घ्यावी.
 - ही भाकरी दही व धने-जीरे पूड न घालता फक्त पाणी वापरून सुद्धा करतात.
 - ह्या भाकरी यासोबत शेंगदाण्याचा ठेचा किंवा शेंगदाण्याची चटणी (त्यावर तेलाची धार) छान लागते.
 - हल्ली या पिठाच्या पुऱ्या पण करतात. वरील प्रमाणे कणिक तयार करून छोटे छोटे गोळे करून त्याच्या पुऱ्या लाटाव्यात आणि तेलात खरपूस लाल तळाव्यात.
 
वऱ्हाडी ठेचा :
मिरच्या  १५  मिनिटे  पाण्यात  भिजत  ठेवा  नंतर  तेल  सोडून  वरील  सर्व  जिन्नस  एकत्र  वाटावे , नंतर  ती  चटणी  तेलात  खमंग  परतावी........वऱ्हाडी ठेचा  तयार.
मठ्ठयाच्या पाककृती साठी इथे क्लिक करा.
ठेचाच्या पाककृतीसाठी इथे क्लिक करा.
वांग्याच्या भरीताच्या पाककृतीसाठी इथे क्लिक करा.
मठ्ठयाच्या पाककृती साठी इथे क्लिक करा.
ठेचाच्या पाककृतीसाठी इथे क्लिक करा.
वांग्याच्या भरीताच्या पाककृतीसाठी इथे क्लिक करा.

No comments:
Post a Comment
आपल्या प्रतिसादाने नवीन गोष्टी करण्यास उत्साह मिळतो. आपला अभिप्राय, सुचना आम्हाला ज़रूर कळवा. आपल्या प्रेमाचा वर्षाव असाच कायम राहो.