ठेचा ……… भाकरी, पिठलं, भरीत असाल की जोडीला ठेचा हवाच. आणि तो होतोही पटकन. भाकऱ्या करून झाल्या की तवा गरम असतानाच तेल घालायचं सगळे जिन्नस त्यात परतायचे. माझी आई तर तो तव्यातच ठेचून करायची, खल-बत्त्याची पण जरूर नाही. आणि बर का हा असा ठेचून करतात म्हणूनच तर याच नाव ठेचा आहे.
Read this recipe in English ..........click here.
साहित्य:
कृती:
तव्यात तेल गरम करून त्यात एक एक करून सर्व जिन्नस परतउन घ्या आणि नंतर मीठ घालून ठेचा. झाल की….
भाकरीबरोबर झक्कास.
करून ठेऊ नका, ताजा बनवा आणि ताजाच खा. फ्रीज मध्ये ठेवला तर टिकतो पण चव जाते.
Read this recipe in English ..........click here.
साहित्य:
- हिरव्या मिरच्या- ३ ते ४ (किंव्हा तुम्हाला झेपतील तेवढ्या )
- लसुण पाकळ्या- १०
- शेंगदाणे - १/४ कप
- कोथिंबीर- थोडीशी
- मीठ- चवीप्रमाणे
- तेल- १ चमचा
कृती:
तव्यात तेल गरम करून त्यात एक एक करून सर्व जिन्नस परतउन घ्या आणि नंतर मीठ घालून ठेचा. झाल की….
भाकरीबरोबर झक्कास.
करून ठेऊ नका, ताजा बनवा आणि ताजाच खा. फ्रीज मध्ये ठेवला तर टिकतो पण चव जाते.
shengdane bhajun ghalayache ka?
ReplyDeletehoy, sarvach jinnas bhajun ghyayache aahet.
Deleteमस्तच आहे, साधी आणि सोपी रेसिपी.धन्यवाद !
ReplyDelete