'वांग्याचं भरीत आणि भाकरी' ही तर आहे अस्सल गावरान मेजवानी. भरीत साधारणपणे सर्व पदार्थ हाताने एकत्र करून केल जात पण तव्यात परतलेल आहे म्हणून तव भरीत.
प्रत्येक प्रांतातलं भरीत चवीला वेगळ लागत. याच कारण म्हणजे तिथली खासियत असणारी वांगी, त्यांचे मसाले आणि करणाच्या पद्धती. पण कुठल्याही पद्धतीच भरीत छानच लागत मग ते खानदेशी असो नाहीतरी कृष्णेच्या काठावरच असो.... काय?
Read this recipe in English.......
साहित्य:
मोठे वांगे- १
मोठा कांदा, चिरून - १
मध्यम टोमाटो- १ (ज्यांना आवडतं नसेल त्यांनी नाही वापरला तरी चालेल)
हिरव्या मिरच्या, कापून - ५ ते ६
लसूण पाकळ्या, ठेचून - ७ ते ८
राई - १ टीस्पून
हळद- १/२ टीस्पून
हिंग- १/२ टीस्पून
तेल- ३ टेबलस्पून
कोथिंबीर- मुठभर
कृती:
तेलाचा हात लाऊन वांगी भाजून घ्यावीत.
वांगी गार झाल्यावर सोलून घ्यावीत. आतमध्ये कीड नाही न ते पाहून घ्यावे व चिरून घ्यावे.
खोलगट तव्यात किंव्हा प्यानमध्ये तेल गरम करून राई, लसुन, मिरची ची फोडणी करून कांदा परतवून घ्यावा. त्यात हळद, हिंग टोमाटो घालून परतवून शिजून घ्यावा. त्यात वांगे व मीठ घालून तेल सुटेपर्यंत परतावे. वरून कोथिंबीर घालावी .
गरम गरम भाकरीसोबत वाढावे.
ज्यांना जास्त तिखट आवडत असेल त्यांनी मिरची लसुन एकत्र वाटून घेऊन वापरावा, त्यामुळे जास्त खमंगपणा येईल.
मिरची एवजी कोल्हापुरी मसाला, कांदा-लसुन मसाला किंव्हा कुठलाही तिखट मसाला वापरायला हरकत नाही.
No comments:
Post a Comment
आपल्या प्रतिसादाने नवीन गोष्टी करण्यास उत्साह मिळतो. आपला अभिप्राय, सुचना आम्हाला ज़रूर कळवा. आपल्या प्रेमाचा वर्षाव असाच कायम राहो.