चटकदार आणि झटपट होणारा पदार्थ.…….
साहित्य:
- टोमॅटो, चिरून- ४ मोठे
- बेसन- १ कप
- तांदूळ पिठ- २ टेबलस्पून
- हिरव्या मिरच्या, चिरून- ३
- लसूण पाकळ्या- ६
- जिरे पूड- १/२ टीस्पून
- हिंग- १/४ टीस्पून
- हळद- १/२ टीस्पून
- लाल मिरची पूड- १/२ टीस्पून
- मिरपूड - १/४ टीस्पून
- मीठ- चवीनुसार
- कोथिंबीर, बारीक चिरून - १/४ कप
- तेल- आवश्यकतेनुसार तळण्यासाठी
- बटर, टोमॅटो केचप, पुदीना चटणी - आवश्यकतेनुसार
- ब्रेड स्लाइस- ६
कृती:
- टोमॅटो, हिरव्या मिरच्या, लसूण एकत्र मिक्सरमध्ये वाटा. पाणी वापरण्याची गरज नाही. पण गरज असल्यास, अगदी थोडेसे पाणी वापरा.
- या टोमॅटो रसात दोन्ही पीठे, हिंग, हळद, मिरची पूड, चिरलेली कोथिंबीर, मिरपूड आणि मीठ घालून चांगले ढवळून मिक्स करावे. गुठळ्या राहू देवू नयेत. मिश्रण अगदी घट्ट किंवा अगदी पातळ असू नये.
- नॉनस्टीक तव्याला तेल लावून घ्यावे. तवा गरम झाला की गॅस कमी करून एक डावभर मिश्रण तव्यावर घालून डावेनेच गोलाकार पसरवावे. कडेने तेल घालावे. वरून झाकण ठेवावे. एक बाजू भाजून खरपूस झाली कि कालथ्याने बाजू पलटावी. दुसरी बाजू भाजावी.
- टोमॅटो सॉस आणि पुदिना चटणीबरोबर गरम गरम सर्व्ह करावे. (मुंबईला टोमॅटो ऑम्लेटबरोबर बटर लावलेला स्लाईस ब्रेड देतात, छान लागतो.)
No comments:
Post a Comment
आपल्या प्रतिसादाने नवीन गोष्टी करण्यास उत्साह मिळतो. आपला अभिप्राय, सुचना आम्हाला ज़रूर कळवा. आपल्या प्रेमाचा वर्षाव असाच कायम राहो.