Friday, October 24, 2014

Shevaya Kheer (शेवयांची खीर)

करायला अतिशय सोप्पी आणि खायला अतिशय रुचकर ………. शेवयांची खीर



Read this recipe in English...click here. 

साहित्य :
जाड शेवया- १ कप
साजुक तूप- १ टेबलस्पून
पाणी- १/२  कप
सायीसह दुध- १ १/२ ते २ कप
साखर-  ५ ते ६ टेबलस्पून (किंव्हा आपल्या आवडीप्रमाणे कमी-जास्त)
वेलची पूड- १/२  टीस्पून
केशर- चिमूटभर (ऐच्छिक)
बदाम- ६
काजू- ६
मनुका/बेदाणे- २ टेबलस्पून

कृती :
बदाम आणि काजूचे काप करा किंवा बारीक तुकडे करा.
एका नॉन-स्टिक किंव्हा जड बुडाच्या पातेल्यात तूप गरम करून त्यात शेवया घालून परताव्या. 
शेवयांना छान सोनेरी तांबूस रंग यायला लागल्यावर त्यात बदाम-काजूचे कप व पाणी घालून झाकून मंद आचेवर २ मिनिटे शिजवावे. (आपण पाण्याऐवजी दूध वापरू शकता, मी पण पूर्ण दूधच वापरते.)
शेवया शिजल्यावर मग साखर घालावी.
व्यवस्थित ढवळुन त्यात केशर व दूध घालावे. दुधाला छान उकळी येऊ द्यावी.
वेलची पूड आणि बेदाणे घालुन व्यवस्थित ढवळुन अगदी मिनिटभर मंद आचेवर शिजवा.
खीर जर जास्त दाटली आवश्यकतेनुसार दूध वाढवावे. पण या शेवयांची खीर थोडी दाटसरच चांगली लागते.
गॅस बंद करून शेवया झाकून ठेवा.
बदामाचे काप आणि केशर घालून गरम किंवा थंड सर्व्ह करावी.


2 comments:

  1. Purna dudh ghalayache asel tar shevaya tupat bhajalyaver lagech sarva 2 cup dudh takave ki, ardhe dudh aadhi aani shevaya shijavalyavar bakiche dudh takave. Please explain.

    ReplyDelete
    Replies
    1. शेवया शिजण्यासाठी आधी अर्धे दूध घालावे, नंतर अर्धे घालावे. जेवायला वेळ असेल तर शेवया शिजून ठेवाव्यात आणि जेवायच्या वेळेला अर्धे दूध घालून एक उकळी काढावी.

      Delete

आपल्या प्रतिसादाने नवीन गोष्टी करण्यास उत्साह मिळतो. आपला अभिप्राय, सुचना आम्हाला ज़रूर कळवा. आपल्या प्रेमाचा वर्षाव असाच कायम राहो.