अश्विन महिन्यातील पौर्णिमा कोजागरी किंव्हा शरद पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. कोल्हापूरला महालक्ष्मी मंदिर येथे कोजागरी पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. ह्या दिवशी "ज्येष्ठ अपत्य निरंजन" असते म्हणजेच ज्येष्ठ मुलाला/मुलीला या दिवशी ओवाळायचे असते.
महाराष्ट्रात कोजागरी पौर्णिमेला लक्ष्मी व कुबेराचे पूजन केले जाते. असे मानले जाते की रात्री देवी लक्ष्मी घरोघरी येते आणि 'को जागर्ती' म्हणजे 'कोण जागे आहे?' असे विचारून जे जागे आहेत त्यांना ती आशिर्वाद देते. म्हणूनच रात्री जागरण केले जाते. भजने आणि गाणी गात रात्र जगवायची असते पण हल्ली गाण्याच्या भेंड्या, संगीत खुर्ची वै.खेळ करत वेळ घालवला जातो. बटाटवडे आणि इतर चटकदार पदार्थांची मेजवानी सोबत असतेच. रात्री १२ वाजता मसाले दुधाचा देवाला नैवेद्य दाखून दुधाचे पातेले गच्चीवर नेउन त्यात चंद्राचे प्रतिबिंब दिसेल असे ठेऊन चंद्राची पूजा करून सगळ्यांना ते मसाला दुध वाटले जाते.
पण फक्त कोजागरी पौर्णिमेलाच मसाला दुध करावे असे नाही. सत्यनारायण पूजा, हळदी-कुंकू वै. सारखी इतर धार्मिक कार्ये असताना चहा-कॉफी किंवा शीतपेय इत्यादी ऐवजी मसाला दुध द्यावे. लहान मुल तसेच गर्भवती स्त्रियांसाठी मसाला दुधाचे सेवन करणे अतिशय उपयुक्त ठरते.
Read this recipe in English.........click here.
साहित्य:
कृती:

- दूध - १ लिटर (शक्यतो म्हैशीचे दुध वापरा)
- साखर - ५ ते ६ टेबलस्पून (किंवा आपल्या आवडीनुसार)
- वेलची पूड- १ टिस्पून
- जायफळ पूड - १ टिस्पून
- बदाम - १५
- पिस्ता - १५
- काजू - ६
- चारोळी - १ टिस्पून
- केशर - १ टिस्पून
- बदाम, पिस्ता व काजू यांच्या पातळ चकत्या - १ टिस्पून (सजावटीसाठी )
कृती:
- बदाम, काजू आणि पिस्ता थोडे भाजून घ्यावेत. खलबत्त्यात किंव्हा मिक्सरवर भरडसर कुटावेत.
- (एकदम बारीक पूड पण करू शकता पण मला असे तोंडात बारीक बारीक तुकडे आलेले आवडतात.)
- एका जाड बुडाच्या पातेल्यात दूध, केशर, साखर, वेलची पावडर, जायफळ पावडर, चारोळी आणि कुटलेल्या सुकामेव्याची भरड एकत्र करा
- सुमारे २० ते ३० मिनीटे मंद आचेवर दूध उकळा. मधेमधे नीट ढवळावे . दूध थोडे आटले पाहिजे
- आपल्या आवडीनुसार गरम किंवा थंड सर्व्ह करावे. पण सहसा गरमच प्यायले जाते.
No comments:
Post a Comment
आपल्या प्रतिसादाने नवीन गोष्टी करण्यास उत्साह मिळतो. आपला अभिप्राय, सुचना आम्हाला ज़रूर कळवा. आपल्या प्रेमाचा वर्षाव असाच कायम राहो.