मुलांना भाज्या खाऊ घालण्यासाठी करावा लागणारा हा प्रकार …… 
Read this recipe in English......click here.
साहित्य:
- गहू पीठ- साधारण ३ कप
 - जांभळा कोबी, बारीक चिरून किंवा किसून- २ कप (१ लहान आकाराचा कोबी)
 - कांदा, बारीक चिरून- १ मध्यम
 - हळद- १/४ टिस्पून
 - हिंग- १/४ टिस्पून
 - धणे पूड- १ टिस्पून
 - तिळ- १ टिस्पून
 - ओवा, खरडून- दिड टिस्पून
 - जीरे - १ टिस्पून
 - आले- 2 "तुकडा
 - हिरव्या मिरच्या- ३ ते ४ (आपल्या चवीनुसार)
 - कोथिंबीर, बारीक चिरून- एक मूठभर
 - मीठ- चवीनुसार
 - तेल किंवा बटर- २ टिस्पून + भाजण्यासाठी आवश्यकतेनुसार
 
कृती: 
- पाणी न घालता आले, हिरव्या मिरची आणि जिरे भरड वाटावे.
 - परातीमध्ये कोबी, कांदा, आलं-मिरच्याचा ठेचा, कोथिंबीर, धणेपूड, हळद, हिंग आणि मीठ एकत्र. हाताने चुरून चांगले मिक्स करावे आणि ५ मिनीटे तसेच राहू द्यावे. मुरून पाणी सुटते.
 - त्यात गव्हाचे पीठ, तिळ, ओवा घालावे आणि मिक्स करावे.
 - त्यात २ टिस्पून गरम तेल (मोहन) टाका. आवश्यकतेनुसार थोडे थोडे पाणी घालुन मळून घ्यावे. ५ ते १० मिनिटे झाकून ठेवा.
 - कणकेचे लहान गोळे करा.
 - प्लास्टिकच्या कागदावर लाटा. लाटण्यासाठी प्लास्टिक कागद वापरल्याने जास्तीचे पीठ न वापरता पराठा लाटता येतो त्यामुळे भाजताना कमी तेल लागते.
 - नॉन-स्टिक तव्यावर दोन्ही बाजूंनी खरपूस भाजा. भाजताना कडेने थोडे थोडे तेल किंव्हा बटर सोडा.
 - गरम गरम पराठा टोमॅटो केचप किंवा दही किंवा कोणत्याही लोणचे/चटणी बरोबर सर्व्ह करा.
 

No comments:
Post a Comment
आपल्या प्रतिसादाने नवीन गोष्टी करण्यास उत्साह मिळतो. आपला अभिप्राय, सुचना आम्हाला ज़रूर कळवा. आपल्या प्रेमाचा वर्षाव असाच कायम राहो.