लहानपनापासून सुकट मला आवडते. हि नुसतीच किंव्ह विविध भाज्यांसह व  विविध प्रकारे बनवता येते. एक प्रकार आज पाहू या.
Read this recipe in English......click here.
साहित्य:
टीप:
सुकट / सुका जवळा:
Read this recipe in English......click here.
साहित्य:
- सुकट / सुका जवळा- १/२ कप
 - कांदा, बारीक चिरून- १ कप
 - लसूण, ठेचून - ८ पाकळ्या
 - वांगे- १ मध्यम
 - बटाटा - १ मध्यम
 - घरगुती मसाला किंवा मालवणी मसाला- ३ टिस्पून
 - हळद - १/२ टिस्पून
 - हिंग- १/४ टिस्पून
 - कोकम/आमसुलं - ३ ते ४ (कैरी किंव्हा आंबोशीचे तुकडे पण कोकमाऐवजी वापरी शकता)
 - कोथिंबीर, बारीक चिरून- २ टेबलस्पून
 - तेल- ३ टेबलस्पून
 - मीठ- चवीनुसार
 
- सुकट निवडून व्यवस्थित धुवा आणि १५ मिनीटे पाण्यात भिजवून ठेवा आणि वापरण्यापूर्वी घट्ट दाबून पिळुन पाणी काढुन टाका.
 - बटाटा सोलुन साधारण १ इंचाचे व वांग्याचे १. ५ इंचाचे तुकडे करा.
 - पॅनमध्ये किंव्हा छोट्या भाजीच्या कुकरमध्ये तेल गरम करावे. त्यात लसूण व कांदा घालून गुलाबी रंगावर परतावे.
 - त्यात हिंग, हळद घालून काही सेकंद परतावे. नंतर त्यात मसाला व घट्ट दाबून पिळुन घेतलेली सुकट टाका आणि जर वेळ परता.
 - त्यात वांगी, बटाटा, मीठ आणि कोकम टाका.
 - ज्या प्रमाणात रस्सा हवा त्यानुसार थोडे पाणी घालावे. चांगले मिक्स करावे आणि कुकरच्या १-२ शिट्ट्या होईपर्यंत शिजू द्यावे. बाहेर शिजवणार असाल तर बटाटा शिजल्यावरच कोकम टाकावे.
 - हि भाजी वरून कोथंबीर घालून तांदूळ किंवा नाचणीच्या भाकरीबरोबर सर्व्ह करावी.
 
टीप:
- जर हि सुकट कुकरमध्ये करणार नसाल तर वांग-बटाटा शिजत आल्यावरच कोकम किंव्हा इतर आंबट घाला. नाहीतर बटाटा शिजणार नाही.
 - याच भाजीत शेवगाच्या/शेकाटाच्या शेंगा घाला, मस्त लागतात. कच्चे/हिरवे टोमॅटो पण यात छान लागतात.
 - येथे मी सुकट वापरली आहे परंतु आम्ही अश्या प्रकारचा रस्सा सुकट, अंबाडीची सुकट, सोडे किंव्हा ताजी कोलंबी वापरून सुद्धा करतो.
 - सुकट वांगी, घेवडा, वाल पापडी, कांद्याची पात, बारीक मेथी इत्यादी भाज्या घालून केली जाते.
 
सुकट / सुका जवळा:


No comments:
Post a Comment
आपल्या प्रतिसादाने नवीन गोष्टी करण्यास उत्साह मिळतो. आपला अभिप्राय, सुचना आम्हाला ज़रूर कळवा. आपल्या प्रेमाचा वर्षाव असाच कायम राहो.