सोप्पी आणि रुचकर …
Read this recipe in English.......... click here.
साहित्य:
कृती:
Read this recipe in English.......... click here.
साहित्य:
- हिरव्या काकड्या - २
- हिरव्या मिरच्या, बारीक चिरून- २
- लिंबाचा रस- १/२ लिंबू
- शेंगदाण्याचा कूट- २ टेबलस्पून
- ओले खोबरे, खवलेले - २ टेबलस्पून (ऐच्छिक )
- कोथिंबीर, बारीक चिरून- मुठभर
- साजूक तूप- १ टीस्पून
- जीरे- १/२ टीस्पून
- हिंग- १/४ टीस्पून
- साखर- १/२ टीस्पून किंव्हा चवीनुसार
- मीठ- चवीनुसार
कृती:
- काकडी धुवून आणि सोलून घ्यावी. काकडीची टोके कापून टाकावी.
- काकडी थोडी चाखून पहावी, कधीकधी काकडी कडू असते. नंतर काकडी चोचवून घ्यावी किंव्हा बारीक चिरावी. चोचवलेल्या काकडीला थोडे मीठ चोळून ठेवावे. २-३ मिनिटांनी काकडी पिळावी व त्यातील जास्तीचे पाणी काढून टाकावे.
- काकडी, शेंगदाण्याचा कूट, ओले खोबरे, कोथिंबीर, मिरची, साखर, लिंबाचा रस व थोडेसे मीठ (मीठ घालताना काळजीपूर्वक घालावे, कारण आधीच काकडीला मीठ लावून ठेवले होते) घालून छान एकत्र करावे.
- कढल्यात तूप गरम करून त्यात जीरे आणि हिंग घालून फोडणी करावी व काकडीत घालावी. झाली तयार खमंग काकडी ……
No comments:
Post a Comment
आपल्या प्रतिसादाने नवीन गोष्टी करण्यास उत्साह मिळतो. आपला अभिप्राय, सुचना आम्हाला ज़रूर कळवा. आपल्या प्रेमाचा वर्षाव असाच कायम राहो.