चिकन कढाई  वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते. त्यातली मला जी आवडते आणि करायला पण सोप्पी आहे अशी हि पाककृती ……… नक्की करून बघा.
कृती:
  
      
   
साहित्य:
- चिकन- ५०० ग्रॅम
 - दही- १/२ कप
 - आले लसूण पेस्ट- ३ टीस्पून
 - हळद- १/२ टीस्पून
 - हिंग- १/२ टीस्पून
 - लाल मिरची पूड- २ ते ३ टीस्पून
 - मीठ- चवीनुसार
 - कांदा, बारीक चिरून - १ कप (२ मध्यम )
 - टोमाटो, बारीक चिरून- १/२ कप (१ मध्यम)
 - हिरव्या मिरच्या- २
 - मसाला वेलची- २
 - तमाल पत्र- ४
 - लवंगा- २
 - काळी मिरी- ५
 - दालचिनी- १ इंचाचा तुकडा
 - जीरे- १/२ टीस्पून
 - धणे पूड- १ टीस्पून
 - गरम मसाला- १ टीस्पून ( ज्यामध्ये मिरची पूड नसेल असा आणि शक्यतो पंजाबी गरम मसाला वापरावा)
 - कसुरी मेथी- १ टीस्पून
 - तेल- ४ ते ५ टेबलस्पून
 - कोथिंबीर, बारीक चिरून - मुठभर
 
- चिकन धूवुन त्याचे मध्यम आकाराचे तुकडे करून घ्यावेत.
 - चिकनला दही, आले लसूण पेस्ट, हळद, हिंग, लाल मिरची पूड, मीठ चोळून २-३ तासांसाठी मुरत ठेवावे.
 - कढईत तेल गरम करून सर्व अख्खे गरम मसाले आणि कांदा घालून, तो सोनेरी रंगावर परतून घ्यावा.
 - त्यात अख्ख्या मिरच्या व टोमाटो घालून मऊ होईपर्यंत परतावा.
 - त्यात चिकन घालून कढईच्या बाजूला तेल सुटेपर्यंत परतावे.
 - नंतर गरम मसाला, धणे पूड घालून नीट एकत्र करून झाकण ठेवा आणि मंद आचेवर १५ ते २० मीनिटे किंव्हा चिकन शिजेपर्यंत शिजू द्या. (जास्तीचे पाणी घालू नका, दही घातल्यामुळे चिकनला पाणी सुटेल व त्या पाण्यावर चिकन शिजेल.) मधेमधे हाताने ढवळा. मध्येच कसुरी मेथी हातावर चुरून त्यात घाला.
 - वरून कोथिंबीर पेरून गरमागरम चिकन चपाती किंव्हा तंदुरी रोटी आणि जीरा राइस सोबत वाढा. पावाबरोबर पण मस्त लागत.
 


No comments:
Post a Comment
आपल्या प्रतिसादाने नवीन गोष्टी करण्यास उत्साह मिळतो. आपला अभिप्राय, सुचना आम्हाला ज़रूर कळवा. आपल्या प्रेमाचा वर्षाव असाच कायम राहो.