पास्ता विथ टोमाटो सॉस ………… हा पास्त्याचा सगळ्यात रुचकर आणि लोकप्रिय प्रकार. चला तर मग पाहू या कसा बनवायचा.
Read this recipe in English....... click here.
टोमाटो सॉस बनवण्यासाठी :
साहित्य:
पास्ता बनवण्यासाठी:
साहित्य:
Read this recipe in English....... click here.
टोमाटो सॉस बनवण्यासाठी :
साहित्य:
- टोमाटो- ६ मध्यम आकाराचे (लालबुंद, पिकलेले असे वापरावेत.)
- कांदा, बारीक चिरून - १ मोठा
- लसुण, बारीक चिरून- १० पाकळ्या
- मिक्स हर्ब्स - १ टीस्पून
- काळी मिरी पूड किंव्हा कुटून- १ टीस्पून
- चिली फ्लेक्स- १ टीस्पून
- लाल मिरची पूड- १/२ टीस्पून
- टोमाटो केचप- २ टीस्पून
- ऑलिव ओईल किंव्हा बटर - ३ टेबलस्पून
- मीठ- चवीनुसार
- पाणी- १ कप
- पाणी उकळत ठेवा. उकळी आली कि त्यात टोमाटो टाकून २-३ मिनिटे शिजवून घ्या. सालाला तडे गेले कि समजावे टोमाटो शिजले.
- थंड झाल्यावर साले काढून टोमाटोचे तुकडे करा आणि मिक्सर मध्ये वाटून त्याची प्युरी बनवा.
- प्यान मध्ये तेल गरम करून कांदा आणि लसूण गुलाबी रंगावर परतून घ्या.
- त्यात मिरची पूड आणि मीठ घालून जरास परता.
- त्यात टोमाटो प्युरी, मिक्स हर्ब्स, चिली फ्लेक्स, काळी मिरी पूड, टोमाटो केचप व पाणी टाका. (शक्यतो टोमाटो शिजवण्यासाठी वापरलेलेच पाणी वापरा. ) छान एकत्र करून उकळी येऊ द्या. मध्ये मध्ये ढवळत रहा.
- हा सॉस तुम्हाला लगेच वापरायचा नसेल तर थंड करून फ्रिझरमध्ये ठेवा. महिनाभर चांगला राहील.
पास्ता बनवण्यासाठी:
साहित्य:
- पेने पास्ता किंव्हा इतर पास्ता- १ पाकीट (२५० ग्रॅम )
- टोमाटो सॉस- वर कृती दिली आहे
- गाजर, छोटे चौकोनी तुकडे करून- १/४ कप
- ब्रोक्कोली- १/२ कप
- सिमला मिरची- १/२ कप
- बेबी कॉर्न्स, छोटे तुकडे करून -१/४ कप (किंव्हा स्वीट कॉर्नचे दाणे, उकडलेले - १/४ कप)
- ऑलिव ओईल किंव्हा बटर - जरुरीप्रमाणे
- चीज,किसलेले - १/४ कप
- मीठ- चवीनुसार
- पास्ता च्या पाकीटावर दिलेल्या सूचनेप्रमाणे पास्ता शिजऊन घ्यावा. (पाणी उकळत ठेवावे, त्यात मीठ घालावे. उकळी आली की पास्ता टाकून ८-१० मिनिटे शिजवावा. जास्त शिजऊ नये, मऊ पडतो. शिजला कि चाळणी मध्ये ओतून निथळत ठेवावा. वरून थंड पाणी ओता.)
- थोड्याश्या तेलावर मीठ आणि मिरी पूड घालून सर्व भाज्या एक एक करून २-३ मिनिटे परतून घ्याव्यात.
- वर सांगितलेला टोमाटो सॉस उकळत ठेवावा, त्यात परतलेल्या भाज्या, उकडलेला पास्ता, किसलेले चीज घालून व्यवथित एकत्र करून घ्या.
- वरून किसलेले चीज घालून गरमागरम वाढा आणि गरमागरम खा.
- भाज्या आवडत नसतील तर नाही वापरल्या तरी चालतील. नुसता सॉस व चीज मधला पास्ता पण छान लागतो.
- भाज्यांच्या एवजी परतलेले चिकनचे तुकडे घातले की झाला चिकन पास्ता.
- पास्ता वेगवेगळ्या आकारात बाजारात उपलब्ध आहे.
Very yummy and flavorful pasta
ReplyDeleteThanks Gloria.
ReplyDelete