पावसाळा  आला की बाजारात मके दिसायला लागतात. मग मके भाजून खायचा कंटाळा आला की अशी मक्याची भजी करून बघा. 
साहित्य :
- मक्याचे दाणे - १ कप
 - कापलेला कांदा - १/२ कप
 - बेसन १/४ कप
 - तांदुळाचे पीठ- २ टीस्पून
 - आलं - १ इंचाचा तुकडा
 - मिरच्या- ३ ते ४
 - जिरे पूड- १ टीस्पून
 - धणे पूड- १ टीस्पून
 - हळद- १/२ टीस्पून
 - हिंग- १/२ टीस्पून
 - चिरलेली कोथिंबीर - १/४ कप
 - मीठ चवीनुसार
 - तेल- तळण्यासाठी आवश्यकतेनुसार
 
कृती:
- मक्याचे दाणे , मिरची आणि आल मिक्सरमध्ये पाणी न घालता भरड वाटा. फूड प्रोसेसर वापरलात तर छान भरड निघेल.
 - वाटलेल्या मिश्रणात कांदा, कोथिंबीर, वरील सर्व मसाले, बेसन,तांदुळाचे पीठ, मीठ आणि आवश्यकतेनुसार थोडे पाणी टाकून सर्व एकत्र करा.
 - नेहमीप्रमाणे सर्व भज्या तळुन घ्या. गरमागरम टोमाटो केचप किंवा कुठल्याही चटणीसोबत वाढा. पावसाळ्याची मजा लुटा.
 

No comments:
Post a Comment
आपल्या प्रतिसादाने नवीन गोष्टी करण्यास उत्साह मिळतो. आपला अभिप्राय, सुचना आम्हाला ज़रूर कळवा. आपल्या प्रेमाचा वर्षाव असाच कायम राहो.