हा मसालेदार डोसा/घावन  खूपच रुचकर आणि किस्पी होतो. ह्यात अंड असल्यामुळे यशाची खात्री १०० % अजिबात मोडणार नाही.  
Read this recipe in English.....
साहित्य:
- अंडी-२
 - तांदुळाचे पीठ- १ कप
 - बारीक चिरलेला कांदा- १/२ कप
 - बारीक चिरलेला टोमाटो - १/४ कप
 - बारीक चिरलेली कोथिम्बिर- १/४ कप
 - आल-लसुन पेस्ट- १ टीस्पून
 - हिरवी मिरची ठेचा- १ टीस्पून किंव्हा कमी-जास्त तुमच्या आवडीप्रमाणे
 - हळद- १ टीस्पून
 - हिंग- १/४ टीस्पून
 - पाणी- अंदाजे १ कप
 - मीठ आणि मिरपूड -चवीप्रमाणे
 - तेल- आवश्यतेनुसार
 
कृती:
- कांदा आणि टोमाटो फूड प्रोसेसर मध्ये फिरवून घेतलत तर छान बारीक होईल आणि मिळून येईल.
 - एका बाउल मध्ये पाणी व तेल सोडून बाकी सर्व साहित्य एकत्र करा. पाणी लागेल तसे हळूहळू घाला.
 - व्यवस्थित फेटून घ्या. मिश्रण डोश्यासारख सरसरीत झाल पाहिजे. मिश्रण डोश्यापेक्षा थोडं पातळ चालेल.
 - डोसा तवा गरम करून थोड तेल पसरवा. वाटीत मिश्रण घेऊन तव्याच्या कडेपासून मध्यापर्यंत ओता. जास्त जाडसर करू नका. झाकण ठेऊन १-२ मिनिटे शिजू द्या.
 - उलटून घ्या. छान सोनेरी रंगावर दोन्ही बाजूनी भाजून घ्या .
 - गरमागरम घावणे केचप बरोबर वाढा.
 - चिकन किंव्हा कोलंबीच्या करी सोबत पण छान लागतात .
 

Thank you
ReplyDelete