भारंगी हि एक रानभाजी आहे. हि भाजी फक्त पावसाळ्यातच बाजारात येते. हि भाजी पोटाच्या विकारांवर अतिशय गुणकारी आहे. आपल्या आयुर्वेदात या वनस्पतीचे अनेक औषधी गुणधर्म सांगितले आहेत. त्यामुळे वर्षातून किमान एकदा तरी हि भाजी नक्की खाल्ली पहिजे.
साहित्य:
भारंगीची पाने:
कृती:
भाजी कापून उकडून घ्या . तेलावर कांदा, लसुन आणि ४-५ लाल सुक्या मिरच्या तोडून टाका. कांदा गुलाबी झाला की त्यात उकडलेली भाजी पिळून टाका. मीठ टाकून भाजी परतून घ्या. झाकण लाऊन दोन वाफा काढा. भाजी तयार. वरून खोबर पेरा.
साहित्य:
- भारंगीची पाने- २ वाटे (चिरून अंदाजे २ कप)
- वाल किंवा पावटे - १/४ कप
- कांदा,चिरून - १ मध्यम आकाराचा
- लसूण पाकळ्या, ठेचून - ६ ते ८
- हळद- १/२ टीस्पून
- हिंग- १/४ टीस्पून
- घरगुती मसाला किंव्हा मिरची पावडर- २ टीस्पून
- तेल- ३ ते ५ टेबलस्पून
- मीठ- चवीनुसार
- खवलेले ओले खोबरे- २ टेबलस्पून (ऐच्छिक )
भारंगीची पाने:
- आदल्या दिवशी रात्री, वाल/पावटे स्वच्छ धूऊन पाण्यात भिजत घालावेत.
- प्रथम पाने व्यवस्तीत धुऊन घ्यावीत . फार बारीक चिरू नयेत किंव्हा हाताने तोडून घ्यावीत .
- चिरलेली पाने व भिजवलेले वाल एकत्र करून कुकरमध्ये तीन शिट्या काढून उकडून घ्यावेत.
- एका पँन मध्ये तेल गरम करून त्यात कांदा, लसूण टाकून गुलाबी रंगावर परतून घ्या. नंतर त्यात हळद, हिंग व मसाला टाकून परतून घ्या. मीठ व उकडलेली भाजी पिळून त्यात टाका. भाजी फार घट्ट पिळू नका नाहीतर भाजी खूपच कोरडी होइल.
- छान एकत्र करून झाकण लाऊन दोन वाफा काढा. भाजी तयार. वरून खोबर पेरा.
- भाकरी किंव्हा आमटी-भातासोबत गरमागरम वाढा.
भाजी कापून उकडून घ्या . तेलावर कांदा, लसुन आणि ४-५ लाल सुक्या मिरच्या तोडून टाका. कांदा गुलाबी झाला की त्यात उकडलेली भाजी पिळून टाका. मीठ टाकून भाजी परतून घ्या. झाकण लाऊन दोन वाफा काढा. भाजी तयार. वरून खोबर पेरा.
वालाच्या एवजी छोट्या लाल चवळ्या वापरू शकता.
Bharangi mhanjech chandan batawa aahe ka? Pane tashich distat mhanun vatale.
ReplyDeleteनाही हि फक्त पावसाळ्यातच मिळते आणि रानातच उगवते. चंदन बटवा म्हणजे पंजाबी लोक "सरसोका साग" या भाजीत मोहरीच्या पानासोबत जी "बटूवा" नावाची भाजी वापरतात ती, ती हिवाळ्यात मुबलक प्रमाणात उपलब्ध असते.
Delete