अडाई डोसा पौष्टिक, प्रथिनयुक्त आणि लोकप्रिय दक्षिण भारतीय नाश्ता आहे. अडाई डोसा हा 'मिक्स डाळ डोसा' यापेक्षा वेगळा असतो कारण यात डाळीसह तांदूळ सुद्धा वापरतात.
Read this recipe in English.......click here.
साहित्य:
कृती:
टिपा:
Read this recipe in English.......click here.
साहित्य:
- जाडा किंवा इडलीचा तांदूळ - 1½ कप
- चणा डाळ- ½ कप
- तूर डाळ - ¼ कप
- उडीद डाळ- ¼ कप
- मुग डाळ- ¼ कप
- मसूर डाळ * - ¼ कप (ऐच्छिक)
- मेथी दाणे * - ½ टीस्पून (ऐच्छिक)
- कांदा किंवा मद्रासी छोटे कांदे, चिरून- 1 कप
- कोथिंबीर, बारीक चिरून- एक मूठभर
- कढीपत्ता, बारीक चिरून- 2 टेबलस्पून
- हिरवी मिरची, बारीक चिरून * - 2 टेबलस्पून (पर्यायी)
- आले, किसून- 2 टेबलस्पून
- ओले खोबरे, खवलेले- 2 टीस्पून
- हिंग- ¼ टिस्पून
- हळद * - ¼ चमचा (ऐच्छिक)
- लाल सुक्या मिरच्या (ब्याडगी)- 10 (किंवा मिरची पूड- 2 ते 3 टिस्पून)
- खायचा सोडा- चिमूटभर (ऐच्छिक)
- मीठ - चवीनुसार
- तेल- आवश्यकतेनुसार
कृती:
- तांदूळ आणि सर्व डाळी धुवा. किमान 5 तास किंवा पूर्ण रात्रभर तांदूळ आणि डाळी वेगवेगळ्या भिजत घाला. मेथी दाणे डाळीतच भिजायला टाका.
- तांदूळ आणि लाल मिरच्या वाटून एक मोठ्या वाडग्यात काढा.
- सर्व डाळी एकत्र जराश्या भरडसर वाटाव्या.
- वाटलेले तंदुलांनी डाळी एकत्र करा. 2 ते 5 तास पीठ आंबवण्यासाठी ठेवा किंवा वाटल्यावर लगेच डोसे केले तरी चालतात. पण थोड्यावेळ पीठ आंबवले तर डोसे हलके आणि रुचकर होतात.
- डोसे करायला घेण्यापूर्वी पीठात चिरलेला कांदा, कोथिंबीर, कढीपत्ता, मिरची, आलं, खोबरं, हळद, हिंग, मीठ आणि बेकिंग सोडा घालावा. ढवळुन मिक्स करावे. पीठ इडली सारखेच असावे. गरज असल्यास पाणी टाका.
- तवा गरम करून आणि थोडे तेल पसरवा आणि पळीभर पीठ डोसा घाला. डोश्यापेक्षा जाड आणि उत्तप्यापेक्षा पातळ असा डोसा घालावा.
- डोश्याच्या बाजूने आणि वरून थोडे तेल सोडवे. मध्यम गॅस वर झाकण ठेवून १-२ मिनिट शिजवावे. मग डोसा पलटून आणि पुन्हा एक मिनिट शिजवावे.
- टोमॅटो चटणी किंवा नारळाची हिरवी चटणी किंवा कोणत्याही प्रकारच्या चटणीबरोबर हे डोसे गरमागरम सर्व्ह करा.
टिपा:
- * असे चिन्हांकित केलेले साहित्य मुळ पाककृतीत नाहीत, मी चव वाढवण्यासाठी वापरले आहेत. तुम्ही ते वगळले तरी चालेल.
- डाळ-तांदूळ वाटल्यावर लगेचच डोसा करणार असाल तर बेकिंग सोडा वापरा,अन्यथा गरज नाही.
- जर चुकून पिठ पातळ झाले, तर बारीक रवा घाला. रवा घातल्यावर किमान अर्धा तास पिठात भिजला पाहिजे.
- जाड डोसे आवडत नसतील तर पीठात थोडे पाणी घालून पातळ डोसे पण करता येतात.
- या डोश्याला 'पूर्णान्न' बनवण्यासाठी पीठात गाजर, कोबी, पातीचा कांदा, सिमला मिरची, पालक, शेवग्याची पाने किंवा शेपू सारख्या भाज्या घाला. चव तर वाढेलच सोबत पौष्टीकताही.
No comments:
Post a Comment
आपल्या प्रतिसादाने नवीन गोष्टी करण्यास उत्साह मिळतो. आपला अभिप्राय, सुचना आम्हाला ज़रूर कळवा. आपल्या प्रेमाचा वर्षाव असाच कायम राहो.