अळूची पातळ भाजी किंवा अळूचे फतफते/फदफदे योग्य प्रकारे बनवली तर खूपच रुचकर लागते. काहीजण फतफत्याला नाकं मुरडतात पण ज्यांना आवडते, त्यांच्यासाठी फतफते म्हणजे तृप्तीची परमावधी असते. काही ठिकाणी फतफते लग्न किंवा श्राद्धाला करण्याची पद्धत आहे.आळूची भाजी खरतरं वर्षभर मिळते पण पावसाळ्यात मिळणारी अळूची भाजी चवीला जास्त चांगली असते. अळूमध्ये अ व क जीवनसत्त्वे असतात तसेच भरपूर प्रथिनेही असतात.
अळूचे फतफते वेगवेगळ्या पद्धतीने करतात. मी इथे माझ्या आईची सोप्पी रेसिपी देते आहे. फारसे साहित्य न वापरूनही हि अशी भाजी छान लागते. माझी खात्री आहे तुम्हालाही आवडेल.
Read this recipe in English. Click here.
सूचना:
साहित्य:
कृती:
अळूचे फतफते वेगवेगळ्या पद्धतीने करतात. मी इथे माझ्या आईची सोप्पी रेसिपी देते आहे. फारसे साहित्य न वापरूनही हि अशी भाजी छान लागते. माझी खात्री आहे तुम्हालाही आवडेल.
Read this recipe in English. Click here.
सूचना:
- अळूच्या अनेक प्रजाती आहेत. पण त्या सर्व खाण्यायोग्य नाहीत. काही रानटी प्रजाती विषारी आणि अतिशय खाजऱ्या असतात. त्यामुळे खरेदी करताना काळजी घ्या. रानात किंवा ओसाड जागी उगवलेले अज्ञात अळू आणू नका.
- अळू हाताळण्यापूर्वी हातावर तेल चोळा. देठातून एक प्रकारचा रस बाहेर येतो, तो त्वचेला लागल्यास खाज येण्याची शक्यता असते.
- काळजीपूर्वक चिरून घ्या. चाळणी आणि चमच्याने मदतीने हात न लावता नळाखाली धुवा.
- काही जणांची त्वचा संवेदनशील असते. एवढी काळजी घेतल्यावरही जर खाज येत असेल तर हातावर लिंबाचा रस चोळून हात धुवा. जास्त खाज येत असेल तर हातावर तुरटी किंवा तूप चोळा.
- एवढ्या सगळ्या सूचना लिहिल्या आहेत म्हणून घाबरून जाऊ नका. शिजताना चिंच, तेल आणि मसाले यांच्या वापराने खाजरेपणा नाहीसा होतो.
- आणखी एक गोष्ट ... या रसाने कपडेही देखील डागळतात.
साहित्य:
- अळू , चिरून- साधारण 3½ कप (4-5 पाने आणि थोडी देठे)
- हिरव्या मिरच्या, चिरून- 2
- शेंगदाणे- ½ कप
- छोट्या लिंबाएवढी चिंच किंवा घट्ट चिंचेचा कोळ- 1 टेबलस्पून किंवा आवडीनुसार
- गुळ - 2 ते 3 टिस्पून किंवा आवडीनुसार
- तेल- 2 ते 3 टेबलस्पून
- मोहरी- 1 टीस्पून
- जिरे- 1 टीस्पून
- हिंग- ½ टीस्पून
- हळद- ½ टीस्पून
- मिरची पूड- 1 टीस्पून किंवा आवडीनुसार
- मीठ- चवीनुसार
कृती:
- शेंगदाणे किमान 3-4 तास पाण्यात भिजत घाला. मग कुकरला थोडेसे मीठ टाकून शिजवा. 1-2 शिट्ट्या होऊ द्या.
- हाताला तेल चोळून घ्या. देठावरील बाह्य जाड, कडक भागव दोरे काढून टाका. आतील पांढरा आणि मऊ भाग घ्या.
- पानांच्या शीरा काढून पाने बारीक चीरा. देठे सुद्धा काळजीपूर्वक बारीक चीरा.
- काळजीपूर्वक चिरून घ्या. चाळणी आणि चमच्याने मदतीने हात न लावता नळाखाली धुवा.
- चिंच पाण्यात भिजवून ठेवा व थोड्यावेळाने पिळून कोळ काढून घ्या.
- कुकरच्या भांड्यात चिरलेली भाजी टाका. त्यात मिरच्या कापून टाका. थोडे पाणी टाका आणि शिजवा. 2 शिट्ट्या होऊ द्या.
- पावभाजी मॅशर किंवा रवी किंवा हन्ड ब्लेंडरने गरगट/ मॅश करा.
- एका कढईत तेल गरम करून मोहोरी टाका आणि ती तडतडली की जिरे, हिंग, हळद आणि लाल तिखट घाला. चमच्याने हलवून घ्या.
- लगेचच उकडलेले शेंगदाणे घाला आणि मिनिटभर परता.
- आता त्यात अळूचे मिश्रण घाला. छान ढवळून घ्या.
- फतफते कितपत पातळ हवे त्या प्रमाणात (साधारण 1 कप) पाणी घाला. आमटीप्रमाणे फार पातळ करू नका
- तुम्हाला कितपत आंबट-गोडं आवडत त्या प्रमाणात चिंचेचा कोळ आणि गुळ घाला. (अंदाज नसेल तर आधी कमीच घाला. चाखून बघा. नंतरही चिंच-गुळ वाढवता येतो. वाढवल्यावर एक उकळी घ्यायची.)
- त्यात मीठ आणि आवडत असेल तर 1 टीस्पून गोडा मसाला घाला. छान ढवळून घ्या. झाकण ठेवून मंद आचेवर 5 मिनिटे शिजू द्या.
- गरमागरम भातासोबत किंवा पोळीबरोबर सर्व्ह करा.
टिपा:
- काही ठिकाणी चणाडाळ भिजवून शेंगदाण्यासोबत उकडून घेवून या भाजीत टाकतात.
- हवे असल्यास खोबऱ्याचे काप आणि मुळ्याचे तुकडे फोडणीत शिजवून घेता येतील.
- आपल्या आवडीनुसार चिंच आणि गूळ प्रमाण कमीजास्त करू शकता.
- या भाजीत गोडा मसाला वापरू शकता.
- भाजी पातळ करायची असेल किंवा भाजी मिळुन येण्यासाठी बेसन घाला. भाजी शिजली की घोटताना बेसन चाळुन घाला नाहीतर गुठळ्या होतात.
- अळू ऐवजी पालक वापरूनही हि भाजी करू शकता.
- लसणाची चव आवडतं असेल तर कढल्यात जरासं तेल घेवून त्यात 2 टिस्पून लसूण काप तपकिरी होईपर्यंत परता. तयार भाजीवर हि फोडणी ओतुन झाकून ठेवा. (अळूच्या भाजीपेक्षा या प्रकारे केलेल्या पालकाच्या पातळ भाजीवर लसणाची फोडणी मस्त लागते.)
छान रेसीपी दिली आहे . Mr.Hello Komal sameer Morey
ReplyDeleteCham test
ReplyDelete