शाही चिकन कोरमा रोटी किंव्हा नानबरोबर छान लागतो. त्याची क्रिमी आणि घट्ट ग्रेव्ही चविष्ट लागते. हा फोटो जरा खराब आला आहे पण चिकन कोरमाची चव अगदी उत्तम. :)
कृती:
साहित्य:
- चिकन- ७५० ग्रॅम
- कांदा, उभा चिरून - २ मोठे
- वेलची- २
- मसाला वेलची- २
- तमाल पत्र- ४
- लवंगा- २
- काळी मिरी- ५
- दालचिनी- २ इंचाचा तुकडा
- जीरे- १/२ टीस्पून
- जायपत्री - १
- चक्रीफुल- २
- तेल- ६ ते ७ टेबलस्पून
चिकनला लावायचा मसाला-
- दही- ३/४ ते १ कप
- लिंबाचा रस- १ टेबलस्पून
- हळद- १/२ टीस्पून
- हिंग- १/२ टीस्पून
- लाल मिरची पूड- २ ते ३ टीस्पून
- धणे पूड- १ टीस्पून
- गरम मसाला- १ टीस्पून
- मीठ- चवीनुसार
शाही पेस्ट बनवण्यासाठी-
- आले- १ इंच
- लसूण- ६ पाकळ्या
- हिरव्या मिरच्या- ४ ते ५
- कोथिंबीर, चिरून - मुठभर
- पुदिना पाने- १०
- काजू- ५
- बदाम- ५
- तीळ- १ टीस्पून
कृती:
- चिकन धूवुन त्याचे मध्यम आकाराचे तुकडे करून घ्यावेत.
- चिकनला लावण्यासाठी जो मसाला तयार केला आहे तो चिकनला चोळून २-३ तासांसाठी मुरत ठेवावे.
- काजू, बदाम व तीळ कोरडेच थोडेसे भाजुन घ्यावेत. शाही पेस्ट बनवण्यासाठी दिलेले सर्व साहित्य एकत्र मिक्सरमध्ये थोड्याश्या पाण्यासोबत बारीक वाटुन घ्यावेत.
- कढईत तेल गरम करून सर्व अख्खे गरम मसाले आणि कांदा घालून, तो सोनेरी रंगावर परतून घ्यावा.
- त्यात चिकन घालून कढईच्या बाजूला तेल सुटेपर्यंत परतावे.
- नंतर शाही पेस्ट घालून नीट एकत्र करून तेल सुटेपर्यंत परतावे.
- झाकण ठेवा आणि मंद आचेवर १५ ते २० मीनिटे किंव्हा चिकन शिजेपर्यंत शिजू द्या. (जास्तीचे पाणी घालू नका, दही घातल्यामुळे चिकनला पाणी सुटेल व त्या पाण्यावर चिकन शिजेल.) मधेमधे ढवळा.
- वरून कोथिंबीर पेरून गरमागरम चिकन चपाती किंव्हा तंदुरी रोटी आणि जीरा राइस सोबत वाढा.
No comments:
Post a Comment
आपल्या प्रतिसादाने नवीन गोष्टी करण्यास उत्साह मिळतो. आपला अभिप्राय, सुचना आम्हाला ज़रूर कळवा. आपल्या प्रेमाचा वर्षाव असाच कायम राहो.