Friday, December 5, 2014

Dudhi Muthiya (दुधी मुठीया)

दुधी मुठिया हा गुजराती पदार्थ अतिशय पौष्टिक आणि चविष्ट आहे.


Read this recipe in English, plz click here. 

साहित्य:
दुधी भोपळा- १ मध्यम आकाराचा
गहू पीठ (कणिक)- १ कप
बारीक रवा - १ कप
बेसन- १ कप
आले- २ इंच
हिरव्या मिरच्या - 2
लाल तिखट/ मिरची पूड- १ टिस्पून
तीळ- १/२  टिस्पून
जिरे- १ टिस्पून
धणे पूड - १/२  टिस्पून
हळद - १/२  टिस्पून
हिंग - १/२  टिस्पून
बडीशेप- १/२  टिस्पून
लिंबू रस - २ टिस्पून
साखर- एक चिमूटभर
कोथिंबीर, चिरून- १/२  कप
खायचा सोडा (बेकिंग सोडा) - १/२  टिस्पून
मीठ-चवीप्रमाणे
तेल- २ टीस्पून

फोडणीसाठी:
तेल- ३ ते ४ टेबलस्पून
कढीपत्ता- २ डहाळ्या
मोहोरी- १ टिस्पून
तिळ - २ टीस्पून
हिंग- १/४  टिस्पून

सजावटीसाठी: बारीक चिरलेली कोथिंबीर

कृती:
आले, हिरव्या मिरच्या आणि जिरे एकत्र भरड वाटा.
दुधी किसून  आणि पिळून घ्या. पण हे दुधीचे पाणी टाकू नका. नंतर कणिक मळण्यासाठी उपयोगी पडेल.
दुधी, गव्हाचे पीठ, रवा, बेसन, जिरे-आले-हिरवी मिरचीचा ठेचा, हळद, बडीशेप, लिंबाचा रस, साखर, कोथिंबीर, सोडा, हिंग, हळद व मीठ  परातीत एकत्र करा. चांगले मिक्स करावे.
बाजूला काढून ठेवलेले दुधीचे पाणी थोडे थोडे घालून कणिक माळून घ्या. तेल घालून पुन्हा छान मळून घ्या. कणिक फार मऊ  नको आणि फार घट्टही  नको .
हातावर थोडे तेल लावून कणकेचे ६ भाग करा. प्रत्येक भागाचा लांबट (दंडगोलाकार) उंडा तयार करा.
स्टीलच्या चाळणीला  तेलाचा हात लावा आणि सर्व उंडे चाळणीत ठेऊन मोदकपात्रात किंव्हा इतर स्टीमरमध्ये २० ते २५ मिनिटे वाफऊन घ्या. मायक्रोवेव्ह स्टीमर पण वापरू शकता.
थोडे थंड झाल्यावर अर्धा इंच रुंदीचे काप करा.
कढईत तेल गरम करून मोहरी, कढीपत्ता, तिळ आणि हिंग टाकून फोडणी करावी. त्यात मुठीयाचे काप तुकडे टाकून २ ते ३ मिनीटे मध्यम आचेवर खमंग परतावे.
वरून कोथिंबीर टाकुन सजवावे.  कैरीच्या किंव्हा नारळाच्या चटणी बरोबर गरम सर्व्ह करा.

2 comments:

  1. पूर्वा तुझी हि रेसिपी पर्वा कोणीतरी मायबोली वर टाकलेली स्वतःची म्हणून.
    आवडली म्हणून करून पहिली आणि एक्दम सुपरहिट झाली. म्हणून तुझा ब्लॉग शोधून इथे क्रेडिट देतेय!
    मी शेवटी फोडणी ऐवजी शॅलो फ्राय केलेल्या वड्या. पुढल्या खेपेस फोडणी करून बघेन.
    हा आयटम आता रेगुलर होणार आमच्या घरी ! :)
    फार काही नाही तर तुझ्या ब्लॉग ची ओळख करून दिल्या बद्दल मी मायबोली सदस्या ची आभारी आहे! ;)
    धन्यवाद!

    ReplyDelete
    Replies
    1. मनापासुन धन्यवाद. हि अशी सुंदर दाद मिळाली, आणखी काय हवे. :)

      Delete

आपल्या प्रतिसादाने नवीन गोष्टी करण्यास उत्साह मिळतो. आपला अभिप्राय, सुचना आम्हाला ज़रूर कळवा. आपल्या प्रेमाचा वर्षाव असाच कायम राहो.