साबुदाणा खीर हि उपवासासाठी केली जाते पण इतर वेळी गोड पदार्थ म्हणुन करू शकता. मस्त चवदार आणि पोटभरीची आहे. मी "साबुदाणा खीर" असा उल्लेख केला आहे पण आमच्या कोकणात हिला "साबुदाण्याची पेज " असे म्हटले जाते.
Read this recipe in English........ click here.
साहित्य:
- साबुदाणा- १/४ कप
- साखर- २ टेबलस्पून
- दुध- १ कप (+ १/४ कप, पातळ खीर आवडत असल्यास घालावे)
- वेलची पूड - १/४ टिस्पून
- केशर- एक चिमूटभर (ऐच्छिक - फक्त सजावटीसाठी)
- बदाम, भाजून कप केलेले - १ टिस्पून (ऐच्छिक - फक्त सजावटीसाठी)
- पाणी- १/२ कप (साबुदाणा भिजवण्यासाठी)
कृती:
- साबुदाणे धुवुन घ्या आणि रात्रभर किंवा किमान ३-४ तास तरी पाण्यात भिजवून ठेवा.
- एका पातेल्यात साबुदाणा, दूध, साखर, वेलची पावडर एकत्र करा.
- मध्यम आचेवर साबुदाणा शिजू द्या. गुठळ्या होऊ नये म्हणुन सतत ढवळत रहा. साबुदाणा शिजला की पारदर्शक होऊ लागतो.
- साबुदाणा तरंगायला लागला याचा अर्थ तो शिजला आहे.
- अजुन पातळ खीर हवी असल्यास १/४ कप दूध घालून, ढवळुन गॅस बंद करावा.
- खीर वाढताना वरून सजावटीसाठी केशर आणि बदामाचे काप घालून गरमागरम सर्व्ह करावी.
No comments:
Post a Comment
आपल्या प्रतिसादाने नवीन गोष्टी करण्यास उत्साह मिळतो. आपला अभिप्राय, सुचना आम्हाला ज़रूर कळवा. आपल्या प्रेमाचा वर्षाव असाच कायम राहो.