ज्यांना सोडे आवडतात त्यांना सोडे घालून केलेला कुठलाही पदार्थ चांगला लागतो ……… आणि मलाही सोडे फार आवडतात. तुम्ही पण करून पहा, तुम्हालाही नक्की आवडेल.
Read this recipe in English....... click here.
साहित्य:
कृती:
टीप: सोड्या ऐवजी सुकट/सुका जवळा घालून सुद्धा हि भाजी खूप मस्त लागते. करायची अगदी हीच पद्धत आहे. पण सुकट घालत असाल तर रस्सा न ठेवता सुकीच करावी, खोबऱ्याचे वाटण घालू नये.
(भाजलेल्या खोबऱ्याचे वाटण- सुके किंवा ओले खोबरे किसून किंवा खोवून घ्यावे आणि कढईत गडद तपकिरी रंगावर खरपूस भाजून घ्यावे. पाणी टाकून वाटून घ्यावे. हे वाटण फ्रिझरला ठेवले तर २-३ महिने व्यवस्थित टिकते. मिक्सर चांगला असेल तर पाण्याशिवायही खमंग भाजलेले खोबरे वाटले जाते, पटकन भरड वाटणे अन्यथा तेल सुटते. जास्त दिवस टिकते. फक्त भाजीत घालताना दिलेल्या प्रमाणापेक्षा थोडे कमी घालावे.)
Read this recipe in English....... click here.
साहित्य:
- सोडे किंव्हा सुकट/सुका जवळा - १/२ कप
- कांदा, बारीक चिरून - १ मध्यम
- वांगे, तुकडे करून - १ मध्यम
- बटाटा, तुकडे करून- १ मध्यम
- फणसाच्या बिया- १० ते १२ (उपलब्ध असतील तर)
- भाजलेल्या खोबऱ्याचे वाटण- २ ते ३ टेबलस्पून
- आले-लसूण वाटण- २ टीस्पून
- हळद- १/२ टीस्पून
- हिंग- १/४ टीस्पून
- घरगुती मसाला किंव्हा मालवणी मसाला- ३ ते ४ टीस्पून
- कोकम- ३ ते ४
- तेल- ३ टेबलस्पून
- मीठ- चवीप्रमाणे
- कोथिंबीर, बारीक चिरून - २ टेबलस्पून
कृती:
- सोड्याचे छोटे छोटे तुकडे करून घ्या. पाण्यात किमान १५ मिनिटे भिजू द्या. नंतर घट्ट पिळून घ्या.
- फणसाच्या बिया ठेचा किंव्हा मध्ये २ भागात कापून घ्या आणि सोलून घ्या.
- छोट्या भाजीच्या कुकरमध्ये तेल गरम करा. त्यात कांदा लालसर परतून घ्या.
- त्यात हळद, हिंग, मसाला, आले-लसुन वाटण, भाजलेल्या खोबऱ्याचे वाटण टाकून तेल सुटेपर्यंत परतून घ्या.
- त्यात सोडे टाकून जरासे परता.
- त्यात सर्व भाज्या, कोकम व मीठ घाला. ज्या प्रमाणात रस्सा हवा असेल त्या प्रमाणात पाणी घाला. जास्त पाणी घालू नका कारण याचा अंगासरशीच (घट्ट) रस्साच चांगला लागतो.
- कुकरला २-३ शिट्ट्या घ्या. वाढताना कोथिम्बिर टाका.
- भाकरी किंव्हा चपाती बरोबर मस्त लागतं.
टीप: सोड्या ऐवजी सुकट/सुका जवळा घालून सुद्धा हि भाजी खूप मस्त लागते. करायची अगदी हीच पद्धत आहे. पण सुकट घालत असाल तर रस्सा न ठेवता सुकीच करावी, खोबऱ्याचे वाटण घालू नये.
(भाजलेल्या खोबऱ्याचे वाटण- सुके किंवा ओले खोबरे किसून किंवा खोवून घ्यावे आणि कढईत गडद तपकिरी रंगावर खरपूस भाजून घ्यावे. पाणी टाकून वाटून घ्यावे. हे वाटण फ्रिझरला ठेवले तर २-३ महिने व्यवस्थित टिकते. मिक्सर चांगला असेल तर पाण्याशिवायही खमंग भाजलेले खोबरे वाटले जाते, पटकन भरड वाटणे अन्यथा तेल सुटते. जास्त दिवस टिकते. फक्त भाजीत घालताना दिलेल्या प्रमाणापेक्षा थोडे कमी घालावे.)
पाकृ आवडली पण एक शंका आहे ती म्हणजे तुमच्या पाककृतींमध्ये जेव्हा 'वाटण्याची उल्लेख असतो ते वाटण करताना काय काय साहित्य वाटणात घालवायचे असतात ते कळत नाही. त्यासाठी जर तुम्ही तुमच्या सर्व प्रकारच्या 'वाटणांचा' वेगळा सेक्शन लिहीलात तर आम्हा वाचकांना ते खुपच सोईचे होईल. आभारी आहेच.
ReplyDeleteसुके किंवा ओले खोबरे किसून किंवा खोवून घ्यावे आणि कढईत तापकिरी रंगावर खरपूस भाजून घ्यावे. पाणी टाकून वाटून घ्यावे, फ्रिझरला ठेवले तर व्यवस्थित टिकते. मिक्सर चांगला असेल तर पाण्याशिवायही वाटण वाटले जाते, फक्त भाजीत घालताना दिलेल्या प्रमाणापेक्षा थोडे कमी घालावे.
Deleteयापेक्षा जर वेगळे वाटण वापरायचे असेल तर तसं त्या पाककृतीत त्याबद्दल तसे लिहिलेले असते.